भाग २ रा मुसलमानी अमल १ : मुहम्मद कासीमचा वकील दाहीर राजास भेटतो [चचनामा :-हा ग्रंथ मूळ अरबी भाषेत कोणी लिहिला ते अज्ञात आहे. इ. स. १२१६ चे सुमारास मुहम्मद अली बिन हमीद याने त्याचे पशियन भाषेत भाषांतर केलें.
- चच " नांवाच्या ब्राह्मण राजाने सिंध प्रांत जिंकून घेतला. यानंतर कांहीं वर्षांनी चचचा मुलगा दाहीर राज्यावर आला. त्यावर मुहम्मद कासीमने स्वारी केली. या घडामोडीची तपशीलवार हकीकत या ग्रंथांत आहे. 'चचनाम्या'मध्ये सिंध प्रांतांतील प्राचीन ग्रामनामें त्याच्या अरबी स्वरूपांत आढळतात. एखादा संस्कृत व अरबी जाणणारा पंडित चचनाम्याचे अध्ययन करील तर सिंध प्रांताचा आठव्या शतकांतील भूगोल उपलब्ध होईल' असे एलफिन्स्टनने म्हटले आहे. ( इलियट व डौसन, खंड १ ला, पृ. १३७. ) या ग्रंथास तारीख-इ- सिंध असेहि म्हणतात. पुढील उतारा दाहीर राजाकडे मुहम्मद कासीमने वकील पाठविला त्या प्रसंगाचा आहे. मुहम्मद कासीमने सिंध प्रांतावर इ. स. ७११ त स्वारी केली.]
जेव्हां ते उभयता 'वकील' दाहीर राजाकडे भेटावयास आले तेव्हां यांच्यापैकीं मौलाना इस्लामी याने रीतीप्रमाणे दाहीर राजापुढे आपले मस्तक नमविलें नाहीं किंवा कांहीं आदरनिदर्शक भाव व्यक्त केला नाहीं r zा मौलाना इस्लामी धर्मांतर करण्यापूर्वी देवल गांवच्या हिंदूंचा प्रमुख ता.1 दाहिराने त्यांस ओळखले व विचारलें कीं, “ तुम्ही नेहमीप्रमाणे पर्वक वंदन कां केलें नाहीं ? तुम्हांस कोणी तसे करण्यास मना केलें आहे ?' त्यावर मौलानाने उत्तर दिले, 'मी जेव्हा तुमचा प्रजाजन होतों - आपल्या आज्ञापालनाचे सर्व नियम मीं पाळावे हे युक्तच होते; परंतु । तर मी इस्लामधर्म स्वीकारला आणि इस्लामी राजावा प्रजाजनहि सो. अशा स्थितीत मी एका काफिरापुढे मस्तक नमवावे, अशी कशी अपेक्षा