पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ......... प्रजेची संपत्ति, त्यांची मुलेबाळे यांचे रक्षण करतो म्हणून राजाला ते (शेतकरी) उत्पन्नाचा एक षष्ठांश देतात. सामान्य लोकांनाहि तोच नियम लागू आहे, पण आपली संपत्ति सांगतांना ते नेहमी खोटे बोलतील. आणि फसवतील ..., कर दिल्यानंतर उरलेली प्राप्ति कशी खर्चावी यासंबंधीं भिन्न मते आहेत. कांहीं जण प्राप्तीचा नववा हिस्सा दानासाठी ठेवतात; कारण ते प्राप्तीचे तीन वाटे करतात-एक हिस्सा हृदयाची चिंता दूर करण्यासाठी शिल्लक ठेवण्यासाठी, दुसरा हिस्सा व्यापार नफा मिळविण्यासाठी आणि तिस-या हिश्श्याच्या तिसरा हिस्सा (म्हणजे प्राप्तीच्या एक नवमांश हिस्सा) दानांत खर्च करण्यासाठी म्हणून ते बाजूला काढून ठेवतात. कांहीं जण प्राप्तीचे चार भाग करतात. एक भाग साधारण खर्च, दुसरा भाग मनौदार्यदर्शक व आदर्श कार्यासाठी, तिसरा दान आणि चौथा भाग शिल्लक म्हणून.--पण तोहि ( हा चौथा भागहि ) तीन वर्षांपर्यंत होणा-या साधारण खर्चापेक्षा अधिक असून चालणार नाही. जर शिल्लक टाकावयाचा एकचतुर्थांश भाग हा या रकमेपेक्षा जास्त झाला, तर तेवढा जास्त भाग दानांत खर्च केला जातो. बेसुमार व्याज घेऊन (Usury) सावकारी करणे किंवा व्याज घेणें है। नियमबाह्य आहे. व्याज घेतल्यास भांडवल ज्या मानाने वाढेल त्या प्रमाणांत त्याने पाप केले असे होईल. शूद्रांना फक्त व्याज घेण्याची परवानगी आहे. पण तेंहि त्याने भांडवलाच्या ६ पेक्षा जास्त घेऊ नये (म्हणजे शं. २ पेक्षा, जास्त दर घेतां येत नाहीं). अभ्यास:--आज यासंबंधी काय व्यवहार चालू आहे ? आज आपण प्रगत आहों को पूर्वी होतो? ....... , |.. भूगोलविषयक माहिती सरसुत (सरसुती= सरस्वती) नदी सोमनाथाच्या पूर्वेस समुद्रास मिळते. यमुना नदी कनोजच्या पुढे गंगेस मिळते. कनोज हे त्या नदीच्या (गंगेच्या) पश्चिमेस आहे. सरस्वती व गंगा यांचेमध्ये आणखी एक नदी आहे. ही नद्री तुर्मुझ व पूर्वेकडील टेकड्यांवरून नैऋत्य दिशेकडे वहात जाऊन. बहरूच. (भडोच) जवळ समुद्रास मिळते. भडोच में सोमनाथ