पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अकराव्या शतकांतील लोकस्थिति ७६ त्याने आपला अनुभव वणला आहे. बनारससारख्या तत्कालीन विद्येच्या केंद्री जाण्याची संधि त्यास मिळालेली दिसत नाहीं. तरीहि भारतातील धर्म, तत्त्वज्ञान, वाङमय, भूगोल, खगोलशास्त्राचे ज्ञान, चालीरीति कायदे यांची इ. स. १०३० च्या सुमाराची माहिती तो ग्रथित करू शकला आहे. विशेषतः त्याने दिलेली हिंदुस्थानची भौगोलिक माहिती इतकी महत्त्वाची आहे कों त्यावरून ‘हिंदुस्थानचा दहाव्या शतकांतील भूगोल' या विषयावर निश्चितपणे एक उपयुक्त टिपण करता येईल. मात्र राजकीय घटनांची माहिती त्याच्या ग्रंथावरून मिळू शकत नाहीं. अल्-बिरूनी धर्माने मुसलमान होता. तथापि हिंदु लोकांच्या तत्त्वज्ञानाबद्दल व विशेषतः श्रीगीतेतील ‘आत्म्याचे अविनाशित्व आदि सिद्धांत त्यास पटले असून त्याने त्याची स्तुति केली आहे. प्रसंगोपात्त अनेक गोष्टींची निदाहि त्याच्या पुस्तकांत आहे. 'तत्कालीन परकीयाने ज्याच्या देशांतील इस्लामी वाचकासाठी केलेले भारताचे वर्णन' या दृष्टीने हे सगळे पुस्तक इतिहासाच्या अभ्यासून वाचण्यासारखे आहे. ।' प्रस्तुत पुस्तकांतील प्रकरण एकचा कांहीं भाग, प्रकरण सत्तावन व : भूगोलविषयक उल्लेख असे तीन उतारे, येथे दिले आहेत. यासाठीं - डॉ. सचौच्या पुस्तकांतील (१९१४ची आवृत्ति) भाग १ पृ. १७-२६ व भाग २ पृ. १४९ व भाग १ पृ. २६१ पहावें.] प्रकरण १ वृत्तांत सांगण्याच्या दृष्टीने प्रास्ताविक म्हणून हिंदूविषयी सामान्य माहिती : १. हिंदुस्थानसंबंधी कोणतीहि माहिती (आपणास) समजण्यास का अवघड जाते याची पूर्ण कल्पना या विषयाचा प्रारंभ करण्यापूर्वी आपणांस होणे आवश्यक आहे ....... वाचकांनी हे ध्यानांत ठेवावें कीं हिंदू हे आपणांहुन प्रत्येक बाबतींत पूर्णपणे निराळे आहेत. ....प्रथम भाषेचा उल्लेख करतो. अर्थात् इतर राष्ट्रांच्या बाबतीतह हा भेद असतो. (हिंदूची) भाषा ही शब्द व प्रत्यय यांच्या बाबतीत खूप समृद्ध व विकासक्षम(of enormous range)आहे ........ त्यांच्या भाषेची दोन रूपे आढळतात : सामान्य लोकांच्या बोलण्याचालण्यांत असणारे ‘प्राकृत' हे एक रूप, दुसरें रूम म्हणजे वरिष्ठ वर्गात व सुशिक्षितांत प्रचलित असलेले सुसंस्कृत