(४) सारांश, ऐतिहासिक घटनेच्या तार्किक विवेचनाबरोबर त्यांतील मानवी बाजूचे चित्रणहि केल्याने ऐतिहासिक सत्य पूर्णतेने समजून येण्यास मदत होते. कारण ' समजणे ' याचा अर्थ नुसते बौद्धिक आकलनच नव्हे तर मनावर ठसा उमटणे, चित्त हेलावणे, आणि त्या त्या प्रसंगाशी समरस होणे हेहि समजणे या शब्दांत येते. ऐतिहासिक साधनांचा या समरसतेस किती उपयोग आहे हे मूळ उतारे वाचल्यानेच कळून येणार आहे. । । प्रस्तुत पुस्तकांत ऐतिहासिक साधनांचे प्राचीन, मुसलमानी, मराठी, ब्रिटिश अंमलकालीन व स्वतंत्र भारत असे ठोकळ पांच भाग केले आहेत, हीं साधने नीट वाचणारास त्या साधनांचे व त्यावरून बनणाच्या इतिहासाचे प्रकृतिभिन्नत्व लक्षात येणार आहे. प्राचीन कालचा इतिहास समजण्यास साधनाची मोठीच अडचण म्हणून तत्कालीन धर्मग्रंथ, धर्माज्ञा, पुराणे, शिलालेख, दानपत्रे, क्वचित् प्रवास वृत्ते, नाणी, वस्तूंचे अवशेष यांवर संतुष्ट रहावे लागते. हीं साधनें संशोधक वृत्तीने व जिज्ञासु बुद्धीने पारखून घेऊन ठिकठिकाणी अज्ञात दुवे तर्काने जुळवून व जुळत नसतील तेथे शोध लागत नाही अशी कबुली देऊन विस्तृत कालखंडावर मधून मधून उड्या मारीत व जपून प्रवास करावा लागतो. प्राचीन इतिहासाच्या अभ्यासास पुराव्याचे पृथक्करण करण्याची संवय असावी लागते. निव्वळ राजकीय असा संगतवार इतिहास जुळविण्याचा नाद सोडावा लागतो, व मिळेल तसतशा पुराव्याने अज्ञात दालनावर पडेल तो प्रकाश उपयोगात आणून एकंदर चित्रपटांत त्याने झालेला फेरफार स्पष्ट करावा लागतो. पण सामाजिक इतिहास पुष्कळ मिळू शकतो. प्राचीन काल सोडून मुसलमानी अंमलाकडे वळलें कीं, तवारीख, तबकत, मलफुझत्, प्रवास वृत्त, जंगनामे, बखरी यांची गर्दी उसळते. येथे पुराव्याच्या अभावावर अडखळण्यापेक्षा पुराव्याचा वारेमापपणा सावधपणाने तपासून घ्यावा लागतो. कारण एक एक लेखक ‘क्या कहूं अशा थाटांत लंब्या चवड्या बाता मारतांना आढळतात, त्या वाचून वाचकाने अगदीं गारीगार होऊन जावे असा प्रकार आहे अशा वेळी लेखक दरबारी आहे की त्रयस्थ आहे, धर्मवेडा आहे कीं तर्कनिष्ठ आहे, प्रत्यक्ष पाहून लिहितो कीं ऐकीव माहितीवर विधान ठोकून देतो या सर्वांचा विचार जमेस धरावा लागतो. मुसलमानी लेखकांच्या लेखनावर ते बव्हंशी
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/11
Appearance