पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राजपुतांची उत्पत्ति | ७५ ३९ । । । राजपुतांची उत्पत्ति [ पृथ्वीराजरासो में महाकाव्य हिदी भाषेच्या प्रारंभिक कालांतील होय. प्राकृत भाषेचे स्वरूप नि हिदीची सुरुवात यांचे मिश्रण त्यांत आढळते. या काव्याचा कवि चन्द हा पृथ्वीराज चव्हाण या सम्राटाचा स्नेही. त्याचे हे काव्य शौर्यप्रधान नि वीररसात्मक आहे. सात हजार श्लोक मीं रचलें असे चंद कवि म्हणतो आणि उपलब्ध प्रतीत १६३०० आहेत. या काव्यांत नंतर पुष्कळच भर पड़ली आहे. अर्थात् हे काव्य ऐतिहासिक मानणे अवघड आहे * असे विद्वानांचे मत बनत चालले होते, परंतु अलीकडे सात हजारच छंद असलेली म्हणजे मळांत चन्दकवीने रचिली एवढीं कवने असलेली एक प्रत सांडली आहे. पृथ्वीराजानंतरच्या अनेक घटनांचे वर्णन पूर्वीच्या प्रतींत असल्याने काव्याची ऐतिहासिक योग्यता कमी होत होती. हा आक्षिप्तभाग या प्रतींत नाहीं. पंजाब युनिव्हसिटीचे उपकुलगुरु वूलनर साहेब एम्. ए. (ऑक्सफर्ड), डी. लिट. (पंजाब) यांच्या उत्तेजनाने, नव्या सांपडलेल्या प्रतीचा हिंदी अनुवाद करण्याचे काय सोलन संस्थानचे राजगुरु साहित्याचार्य पं. मथुराप्रसाद दीक्षित यांनी सुरू केलेले आहे. याच ग्रंथांतून पहिल्या समयांत किंवा सर्गात राजपूत राजांची उत्पत्ति यज्ञकुंडातील अन्नापासून झाली असे सांगणारे वर्णन आहे. ते पुढे दिले आहे. राजपुतांची उत्पत्ति कशी झाली याबद्दल जी भिन्न भन्न मते अहेत, तीं प्रा. ओतूरकरकृत हिंदुस्थानचा सोपपत्तिक इतिहास पृ. ८७-८८ वर पहावीं ] ऋषिराज वशिष्ठांनीं मंत्रजप करून राक्षसांपासून यज्ञ निर्वेध रहावा म्हणून परमेश्वराची प्रार्थना केलो. तेव्हां अग्निकुंडांतून प्रतिहार नांवाचा पुरुष प्रकट झाला व तो यज्ञाच्या द्वारावर ज ऊन उभा राहिला. नंतर ज्याने ब्रह्मचर्यव्रत धारण केले होते असा चालुक्य नांवाचा दुसरा पुरुष प्रकट झाला. त्यानंतर अत्यधिक शौर्यशाली पवार नांवाचा तिसरा पुरुष प्रकट झाला. ऋषि वशिष्ठाने त्याला ‘परमार' शब्दानें आमंत्रित केलें, कारण शत्रूला मारणारा सर्वोत्तम वीर तो होता. त्या तिघांनीं राक्षसाशीं अनुपम संग्राम केला. “पुनः वशिष्ठांनी ध्यान केले तेव्हां प्रचंड चार भुजा, चार मुख, रक्तवर्ण,