पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ ७३ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास वास्तविक यांत चमत्कारिक असे कांहीं नाहीं. हिंदुस्थानांत धार्मिक * मतवैचित्र्याबाबत- उदारपणा सर्वांच्या अंगवळणी पडलेला व प्रसिद्ध । आहे. कल्हण हाहि त्यास अपवाद नाहीं इतकेच. कै. लेले कृत भाषांतरांतून तरंग आठव्यांतील पृ. २१४-१५ व २६१६२ वरील मजकूर पुढे दिला आहे. त्यांत ज्या हर्षांचे वर्णन केले आहे त्याचा मृत्यु इ. स. ११००त झाला. मृत्युसमयीं त्याचे वय ४२ वर्षांचे होते. या हर्षाचा सातव्या शतकांतील कनोजच्या हर्षाशीं कांहीं संबंध नाहीं हे सांगणे नकोच. ] | आमच्या या कथेत (राजतरंगिणींत ) येथवर पुष्कळशा राजांचे बरे वाईट वर्णन होत आले आहे. पण दुर्दैवाने बुद्धीला अगम्य अशा प्रसंगाला ही कथा येऊन पोहोचली आहे. या हर्ष राजाच्या कथेत सर्व त-हेच्या सत्प्रयत्नांचा उदय तसेच ते सारे प्रयत्न व्यर्थ गेल्याचेहि वर्णन करावे लागणार. सर्व प्रकारचे विचारपूर्वक ठरविलेले बेत, तसाच त्या बेतामध्ये राजकारण व राजनीति यांचा अभाव दिसून येतो. तिच्यांत राजसत्तेचे अतिरिक्त निदर्शन, तसेंच व्यवस्थितपणाकडे आत्यंतिक दुर्लक्ष झालेले दिसते. ती कथा आत्यंतिक धौदार्य व त्याबरोबर परस्वाच्या अपहाराची पराकाष्ठा यांनी भरलेली आहे. तिच्यांत अत्यंत कारुण्य तसेच क्रोयतिशय पाहण्यांत येतो..... ती सर्व बाजूनी स्पृहणीय, तरी तितकीच निंद्य,आणि सर्वथा वंद्य तितकीच तिरस्करणीय आहे........ ती कमनीय तितकीच अपकीर्तीमुळे वीट वाटण्याजोगी आहे... हर्षाने पूर्वापार रिवाज व संस्था चालू राहण्यासाठी वडिलांच्या वेळेच्या मंत्र्यांनाच अधिकार व कामे दिली. तो स्वतःच्या सेवकांच्या नादी फारसा लागला नाही. त्याने कंदर्प व मदन यांना अनुक्रमे द्वाराधिकारी व कंपनापति नेमून विजयसिंह वगैरेंनाहि त्यांच्यात्यांच्या योग्य कामें दिली. त्याचा राग शांत झाल्यावर त्याने प्रशस्तकलश वगैरे मंत्र्यांना बंधमुक्त करून त्यांना पूर्वीचीच मोठाली कामें दिली. फक्त नोनक मंत्री व धात्रेय बंधु यांचे अगणित अपकार यानांत आणून त्याने त्या दोघांनाहि सुळावर देवविलें. तरी पुढे प्रसंगविशेषीं, संकटसमयीं व बिकट कामांत त्याला त्या बुद्धिवान् व स्वामिभक्त नोनकाचे स्मरण होऊन पश्चात्ताप होत असे. योग्य माणसांच्या हातून अपकार घडलेला असला तरी त्याचा प्रसंगी उपयोग होत असतो. घर जाळणा-या अग्नीवरसुद्धा स्वयंपाक करून घेता येतो (पृ.२१४-१५)।