पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/104

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काश्मीरच्या हर्षाची कथा ७१ ३७ ; ; ; काश्मीरच्या हर्षाची कथा [ महाकवि कल्हण याने 'राजतरंगिणी' हा ग्रंथ संस्कृत भाषेत इ.स. -११४८-४९ मध्ये लिहिला. (तरंग १ श्लोक ५२ व तरंग८श्लोक ३४००). • या संस्कृत ग्रंथाचे मराठी भाषांतर धारचे के. मा. व्यं. लेले यांनी सर ऑरियल स्टीनकृत इंग्रजी भाषांतर व मूळ ग्रंथ यांवरून केले व तें पुण्याच्या चित्रशाळेने इ.स. १९२९ मध्ये प्रकाशित केलें. भाषांतरकार श्री. लेले प्रस्तावनेत लिहितात, ‘‘सर्व संस्कृत वाङमयांत ज्याला इतिहास हें नांव ब-याच अंशाने लागू करता येईल असा राजतरंगिणी हा एकच सर्वमान्य व सुप्रसिद्ध ग्रंथ आहे,असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाहीं. .....या इतिहासाचा प्राचीन, पौराणिक व दंतकथात्मक भाग, अर्थातच संकलित व कमी विश्वसनीय आहे. मघील कालाचा भाग त्याच्याहून जास्त विस्तृत व विश्वसनीय आणि ग्रंथकत्र्याच्या कालापूर्वीच्या | ५००-६०० वर्षांचा ( भग) चांगलाच तपशीलवार, विश्वसनीय आणि राजकीय व सामाजिक स्थितीच्या वाचनीय वर्णनाने भरलेला आहे." या ग्रंथाच्या शुद्ध प्रतीचे संशोधन करणारे व तिला प्रकाशांत आणणारे " डॉ. स्टीन यांनींहि म्हटले आहे की या राजतरंगिणी ग्रंथाची योग्यता मध्ययुगीन पाश्चात्य ऐतिहासिक ग्रंथ आणि मुसलमानी तवारीख यांच्यापेक्षा कमी नाहीं. ..... लेखकाने केलेले वर्णन निव्वळ स्तुतिपाठकाच्या त-हेचे केलेले नसून त्रयस्थपणाचे व इतिहासलेखकाच्या धर्तीचे आहे. ...हा ग्रंथ कल्हणाने काव्य म्हणून लिहिला आहे, इतिहास म्हणून नव्हे... कल्हणाच्या अंगीं ऐतिहासिक दृष्टीला आवश्यक असा विवेचकपणा नव्हता ... या ग्रंथाच्या शेवटच्या आठव्या तरंगांतील माहिती विशेष तपशीलवार व विश्वसनीय आहे. | कालगणनेच्या दृष्टीने हि डॉक्टर महाशयांचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे.... १ पहिल्या तरंगांतील कालगणना विश्वसनीय नाही, कारण ती केवळ पौराणिक दंतकथा व काल्पनिक अनुमानावरून दिलेली आहे. दुस-या आणि तिस-या तर गाँतील कालगणनेचाहि बहुतेक तोच प्रकार आहे. २. चौथ्या तरंगांतील कालगणनेत पंचवीस वर्षांचा फरक आहे. ३. शेवटच्या भागांतील म्हणजे तरंग ५ ते ८ मधील राजांच्या कारकीर्दीची कालगणना तपशीलवार व विश्वसनीय आहे. डॉ. स्टीन म्हणतात की कल्हण हा पक्का शैव असूनसुद्धा त्याने ‘या ग्रंथांत बौद्धमताविषयी दाखविलेली सहानुभूति चमत्कारिक वाटते