पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/103

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास जीवननिर्वाह मिळवून देण्यासाठी, मंडलेश्वरांचे सर्वस्व ताब्यात घेण्यासाठी, कालप्रियगण्डमार्तण्ड, कृष्णेश्वर यांची मंदिरे उभारण्यासाठी मेल्पाटी येथे माझ्या विजयी सैन्याचा तळ असतांना शके ८८०-कालयुक्त संवत्सर फाल्गुन वद्य त्रयोदशी बुधवारी, मी करहाट' विषयांतील कल्लि द्वादशकापैकीं कके ३ नांवाचे गांव तेथे असलेल्या वृक्षाच्या रांगासकट, हिरण्यादेय, ........... सर्वोत्पत्तिसहित महातपस्वी, सकलसिद्धांत जाणणा-या ईशान शिवाचार्यांचे शिष्य गगनशिव यांस, जो करहाटांतील वल्कलेश्वराचा स्थान पति आहे, आणि जो करंजखे (गांवा)हून आलेला आहे, त्यांस कातिका पूणिमेस ठरविल्याप्रमाणे सर्व तपस्व्यांना आसन आणि वस्त्रे देण्यासाठी यावच्चंद्र दिवाकरौ हें दान देण्यात येत आहे. - या (गांवाच्या) पूर्वेस *कन्हवन्ना नदी, दक्षिणेस पंदुरें” (गांव) पश्चिमेस आढे नांवाचे ग्राम, उत्तरेस तीच कन्हवन्ना नदी......आहे. गगनशिवास के के गांवांत शेती करतांना, करवितांना त्याचा उपयोग करतांना किंवा करवितांना कोणीहि अडथळा आणू नये. | जो अडथळा करील तो पंचमहापातकें ओढवून घेईल कारण असे म्हटलेले आहे कीं, षष्टिवर्षसहस्राणि स्वर्गे तिष्ठति भूमिदः । आच्छेत्ता चानुमन्ता च तान्येव नरके वसेत् ।। ..... योस्यमानें खोदिलें अभ्यास :--१. कृष्णराजाला आणखी कोणतीं नांवें होती ? त्याने केले ? २. हैं दानपत्र कशासाठी दिले आहे ? त्यांत उल्ल खिलेल्या गांवांची आजचीं नांवे काय असावीत ? १. बहुधा मेलपाटी ता. चित्तूर जि. उत्तर अर्काट बुधवार९ मार्च इ. स. ९५९ २. क-हाड. ३ सध्याचे कंकी।

  • कृष्णावेण्णाचे अपभ्रष्टरूप (कै. भांडारकर) ४ पांढुर, ५ आढा