पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८९ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास उपदेशिला. कारण गुणांनी श्रेष्ठ असलेल्या लोकांकडून स्वीकारलेला व अनुष्ठान केला जाणारा धर्म वृद्धि पावेल म्हणून तो अर्जुनालाच उपदेशिला.* भगवानांनी उपदेश केलेला हा धर्म सर्वज्ञ पूज्यवेदव्यासांनीं गीता या नांवाच्या सातशे लोकांच्या प्रबंधांत ग्रथित केला. अभ्यास :--शंकराचार्यांच्या मते श्रीकृष्णाने अर्जुनास गीता का सांगितली ते लिहा. ३६ । । । राष्ट्रकूटांचा कृष्णराज याचे दानपत्र [बादामीच्या चालुक्यांचा पराभव करून राष्ट्रकूट घराणे इ.स.च्या आठव्या शतकांत उदयास आले. प्राचीन काळांतील दक्षिणेतील राजघराण्यांपैकीं हें घराणे महत्त्वाचे होय. श्रीकृष्णाच्या यदुकुलांत आपला जन्म झाला असे राष्ट्रकूट राजे मानीत. (मान्यखेट) मालखेड ही त्यांची राजधानी होती. इतिहासास माहीत असलेला त्यांचा मूळ पुरुष दंतिदुर्ग होय (इ. स. ७५०). या घराण्यांत दुसरा गोविंद, तिसरा अमोघवर्ष, तिसरा कृष्ण हे विशेष पराक्रमी राजे झाले. त्याचे राज्य सुमारे २२५ वर्षे टिकलें. हे अधिपति स्वतःस रट्ट किंवा रठ्ठ म्हणवीत. त्यांचे राज्य मुख्यतः महाराष्ट्रांत होते, पण ते वारंवार उत्तरेत स्वाया करीत व त्यांत ते यशस्वी होत. तिस-या कृष्णाचे साम्राज्य कांची-तंजावुरापासून माळवा-मध्यहिंदुस्थानपर्यंत पसरले होते. प्रस्तुतचा ताम्रपट सातारा जिल्ह्यांतील क-हाड येथे एका जुन्या घराचा पाया खणीत असतां सांपडला. या लेखांत राष्ट्रकूट घरण्याची वंशावळ प्रारंभी दिलेली आहे. देवळी 'वर्धा' यथेहि राष्ट्रकूटांचे ताम्रपट सांपडले, त्यांत हीच वंशावळ शब्दशः लिहिलेली आहे. प्रस्तुतचा लेख हा त्यानंतर १८ वर्षांनी कोरलेला आहे. या लेखांतील कांहीं भाग पुढे भाषांतरित केलेला आहे. त्याचा लेखनकाल इ.स. ९५९ आहे. मूळ लेख ‘एपिग्राफिया इंडिका' खंड ४ पृ.२८६-२९० पहा.]

  • . अर्जुन हा त्या वेळच्या लोकांत मान्यता पावलेला होता. त्यान आचरलेला धर्म सर्वच आचरतील हा भावार्थ.