पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/100

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्यांच्या मते गीतेचे प्रयोजन ३ ६७ केली. सारांश, भारतीयांचे आध्यात्मिक जीवन गीता ग्रंथावरील टीकाप्रतिटीकांतून व्यक्त होत आहे. मात्र कुणाहि एका टीकाकाराला संपूर्ण प्रमाण मानण्याचा प्रघात नसल्याने धर्मग्रंथ एक ठेवूनहि सांप्रदायिकांचा संकुचितपणा वैदिक धर्माच्या अनुयायांत आलेला नाहीं. असो. | शंकराचार्यानीं ग्रंथलेखन केल्यावर कर्ममार्गी कुमारील भट्टाचे शिष्य मंडनमिश्र यांचा वादांत पराभव केला व शेवटीं सबंध हिंदुस्थानभर प्रवास करून उत्तरेस बद्रीकेदार, पूर्वेस जगन्नाथपुरी, दक्षिणेस श्रृंगेरी व पश्चिमेस द्वारका या ठिकाणीं शंकराचार्याचीं पीठे स्थापन केली. इतक्या लहान वयांत एवढे मोठे विधायक कार्य दुस-या कोणी क्वचितच केले असेल! त्यांच्या लेखनाचा नमुना म्हणून पुढील अनुवादित उतारा देत आहों.--‘श्रीमद्भगवद्गीता--भाष्यार्थ' संपादकआचार्य विष्णुशास्त्रीबापट, उपोद्घात पृष्ठ २ ते ५ पहा. गीताभाष्याचे प्रारंभीं गीतेचे प्रयोजन सांगतांना शंकराचार्य लिहितात :] "वेदोक्त धर्म दोन प्रकारचा आहे. एक प्रवृत्ति लक्षण व दुसरा निवृत्ति लक्षण. जो जगाच्या स्थितीचे कारण, प्राण्यांच्या साक्षात् अभ्युदयाचे व मोक्षाचे कारण तो धर्म होय. पुरुषार्थाची इच्छा करणा-या ब्राह्मणादि वर्णाकडून व ब्रह्मचारी-गृहस्थाश्रमी इत्यादि आश्रमींकडून अनुष्ठान केला जाणारा जो तो धर्म होय. | "दीर्घकालाने त्या धर्माचे अनुष्ठान करणा-यांमध्ये विषयतृष्णेचा उद्भव झाल्यामुळे कमी होत जाणारा विवेक व विज्ञान यांना कारण होणा-या अधर्माकडून धर्माचा पराभव होऊ लागला असतां, व अधर्माची वृद्धि होऊ लागली असतां जगाच्या स्थितीचे परिपालन करणारा आदिकर्ता नारायण नांवाचा विष्णु भूलोकाच्या ब्रह्माचे म्हणजे ब्राह्मणत्वाचे रक्षण करण्यासाठीं देवकीच्या ठिकाणीं वसुदेवापासून अंशाने उत्पन्न झाला, हे प्रसिद्ध आहे. ब्राह्मण्याच्या रक्षणाचे कारण असे कीं ब्राह्मणत्वाचे रक्षण केल्याने वैदिकधर्म सुरक्षित राहील. कारण वर्णभेद व आश्रमभेद ब्राह्मणाच्या आधीन आहेत.... त्याला (नारायणाला) कोणतेहि फळ संपादन करावयाचे नसले तरी भूतांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने प्रवृत्ति व निवृत्ति अशा दोन प्रकारचा वैदिकधर्म त्याने शोक व मोह यांच्या महासागरांत निमग्न झालेल्या अर्जुनाला