पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास नाहीं त्यांनीं तो स्वीकरावा अशी आमची विनंती आहे. संरक्षण, परराष्ट्रीय व्यवहार आणि दळणवळण हीं खातीं त्यांनी संघसरकारकडे द्यावी एवढच आमचे म्हणणे.. हा देश व त्यांतील संस्था हाच येथील रहिवाशी लोकांना परंपरागत मिळालेला वारसा होय. या देशांतील कांहीं लोक संस्थानांत आणि कांहीं ब्रिटिश हिंदुस्थानांत आहेत हा योगायोग आहे. आपण सर्व याच देशाच्या स्वभाव वैशिष्ट्याचे व संस्कृतीचे भागीदार आहों. सर्वांचे हित एकच आहे. एवढेच नव्हे तर, आपण रक्ताने आणि भावनेने एकच आहों. ......म्हणून मी असे सुचवितों की आपण परके आहों असे मानून तहनामे करण्यापेक्षा एकत्र बसून मित्र या नात्याने (सर्वांसाठीं) कायदे करणे इष्ट होय. । | सर्वांच्या समान यत्नाने आपण आपल्या देशाला नव्या वैभवास न शकू. आपणांत एकोपा नसेल तर नवीन संकटे आपल्यावर ओढवून घऊ ९' गोष्ट भारतीय संस्थानिक लक्षांत घेतील अशी मला आशा आहे. | अभ्यास :-१. देशाची आधिसत्ता कोणाची आहे, असे सस्या निकांना संस्थानी मंत्र्यांनी सांगितले ? २. संस्थानी प्रजा व संस्थानंतर प्रजा यांत हितविरोध आहे काय ? असल्यास कसा व नसल्यास कां नाहीं त ९१ करा. ३. वल्लभभाईंनी दिलेला इतिहासाचा इषारा उदाहरणाने सिद्ध करा. ३ । । । कॉमनवेल्थमध्ये राहण्याची घोषणा (२७ एप्रिल १९४९) [ हिंदुस्थानचे मुख्य प्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना हिंदुस्थानांत लोकराज्य स्थापन झाल्यावर हि हिंदुस्थान हा कॉमनवेल्थचा समान दर्जाचा सभासद राहील असे इंग्लंडमध्ये जाहीर केले. ते म्हणाले हिदी लोकांच्या राजकीय आकांक्षा तृप्त व्हाव्या यासाठी हिंदुस्थानात सार्वभौम लोकराज्य स्थापन होणे आवश्यक आहे. परंतु हिंदुस्थानका कॉमनवेल्थचे सभासदत्व सोडून जाण्याची इच्छा नाहीं" यासंबंधीच्या सरकारी ठरावाचा सारांशं प्रसिद्ध झाला आहे. टाइम्स ऑफ इंडिया ता. २८ एप्रिल १९४९ पृ. १ कॉ. १ व ३] ४]