पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थान सरकार सार्वभौम आहे ३५१ निजामचे म्हणणे " परराष्ट्रविषयक धोरण व अधिकार यांशी संबंध असणा-या गोष्टी सोडून इतर सर्व अंतर्गत व्यवहारामध्ये ब्रिटिश सरकार ब्रिटिश हिदुस्थानांत जितके स्वतंत्र आहे तितकेच हैद्राबादच्या अंतर्गत व्यवहारामध्ये हैद्राबादचे निजामहि स्वतंत्र आहेत. निकटवर्ती राष्ट्रांमध्ये वेळोवेळी सहज निर्माण होणा-या अंतर्गत व्यवस्थेच्या प्रश्नांबाबत मी सांगितलेली मर्यादा पाळून दोन्हीहि पक्ष संपूर्ण स्वतंत्रतेने वागले आहेत. आतां या मर्यादेमध्ये वहाडचा प्रश्न येत नाहीं व येऊ शकत नाहीं. व-हाडचा विचार करितां परराष्ट्रासंबंधी अधिकार वा धोरण यांचा त्यांत कांहीं एक संबंध येत नाही म्हणून हा प्रश्न एकाच पातळीवर असणा-या दोन सरकारामधील विवाद्य प्रश्न म्हणून गणला जाईल. हे शब्द सार्वभौम सत्तेशी असलेले आपले जे संबंध आहेत त्याबद्दल आपली (निजाम साहेबांची) गैरसमजूत झाली असल्याचे द्योतक आहेत, आणि राजाधिराजांचा प्रतिनिधी या नात्याने ही गैरसमजूत दूर करणे मला आवश्यक आहे; कारण अशा गोष्टींतील माझ्या मौनाचा आपण प्रतिपादलेल्या विधानांना माझी संमति आहे असा अर्थ कदाचित् यापुढे केला जाईल. ब्रिटिश सत्ता सार्वभौम ब्रिटिश राजसत्तेचे सार्वभौमत्व हिंदुस्थानांत सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून कोणाहि हिंदी संस्थानिकास समान भूमिकेवरून ब्रिटिशांबरोबर न्याय्य रीतीने करारमदार करता येणार नाहींत. ब्रिटिश राजसत्तेचे सार्वभौम श्रेष्ठत्व तह व करारमदार यांवर आधारलेले नाहीं. ते यांवाचून स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे; आणि परराष्ट्रविषयक अधिकार व धोरण या अधिकारांव्यतिरिक्त, हिंदी संस्थानिकांबरोबरील तह आणि करारमदार यांना विचारपूर्वक मान देऊन अखिल हिंदुस्थानांत शांतता व सुव्यवस्था राखणे हाहि ब्रिटिश सरकारचा हक्क आहे व हे कर्तव्यहि आहे. यापासून ओघाने येणारे सिद्धान्त एवढे स्वसिद्ध आहेत आणि इतर संस्थानिकांप्रमाणे आपणांसहि ते इतक्या स्पष्टपणे लागू पडतात की त्यांचा निर्देश करण्याची आवश्यकता मुळीच वाटत नाहीं. परन्तु जर दाखले हवेच असतील तर मी आपणांस [ ९७