पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ज्यांनीं अतांपर्यंत लोकमताची धुरा वाहिली त्यांनी या कार्यास प्रारंभ करणे जरूर आहे. सरकारने चालविलेलीं न्यायकोटें, कायदेमंडळ, सरकारमान्य शाळा तसेच सरकारने दिलेल्या पदव्या यावरच सरकारचे स्थैर्य व इभ्रत आहे. हे बव्हंशी लक्षात घेऊन या लोकांनी पुढे सांगितल्याप्रमाणे आचरण करावे. . | (१) पदव्यांचा त्याग करावा, (२) स्थानिक स्वराज्य संस्थातून सरकारनियुक्त जागांचे राजीनामे द्यावेत, (३) सरकारी दरबार समारंभांस जाऊ नये, (४) सरकारमान्य शाळा कालेजांतून आपला मुले काढून घेऊन राष्ट्रीय शिक्षण संस्थाची स्थापना करावी, (५) सरकारी न्यायकचेन्यावर बहिष्कार घालून त्या ठिकाणी लोकांना आपली लवादमंडळे निर्माण करावीत, (६) लष्करी, कारकुना मजूर वर्गानी मेसापोटेमियांत चाललेल्या मोहिमेत भाग घेण्यासाठी पुढे येऊ नये. (७) लवकरच होणा-या निवडणुकांवर काँग्रेसनिष्ठ मतदानीं व उमेदवारांनीं बहिष्कार घालावा, (८) परदेशी मालावर बहिष्कार घालावा. उपरोक्त असहकारिता ही एक शिस्तीचे व स्वार्थत्यागाचे सा" आहे. या साधनाचे प्रत्येक स्त्री पुरुषाने आचरण करणे जरूर जा म्हणून सर्वांनी स्वदेशी कापड वापरण्यास सुरुवात करावी व देशा गिरण्या देशाला पुरेसे कापड निमिण्यास समर्थ नसल्याने घरोघर सूतक' व हातमागावरील कापड विणण्याचे काम जारीने सुरू करावे." | या इतिहासप्रसिद्ध ठरावास बाबू बिपिन चंद्रपाल व देशबंधू । यांनी उपसूचना आणिली होती. परंतु बरीच चर्चा होऊन अखेर म. गाव ठराव पास झाला. अभ्यास :–वरील ठरावांत व्यक्त केलेला कार्यक्रम अम आणल्याने काय परिणाम झाले याचे साधकबाधक विवेचन करा. शांतील Tांधींचा ९४