पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असहकारितेचा ठराव ३४७ असहकारितेचा ठराव [ कलकत्त्याची स्पेशल काँग्रेस ता. ४ सप्टेंबर १९२० ला भरली. महायुद्धाचा शेवट झाल्यावर व जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या या इतिहासप्रसिद्ध अधिवेशनांत म. गांधींनीं असहकारितेसंबंधीं ठराव मांडला, तो १८८६ विरुद्ध ८८४ मतांनीं पास झाला. तो ठराव पुढे दिला आहे. पट्टाभिसीतारामय्या पृ. ३४१] “ज्या अर्थी हिंदुस्थान सरकार व साम्प्राज्य सरकार या उभयतांनी हिंदी मुसलमानांना खिलाफतीसंबंधी दिलेली अभिवचने पार पाडलीं नाहींत व ज्या अर्थी इंग्लंडच्या मुख्य प्रधानांनी हीं अभिवचने बुद्धिपुरस्सर मोडलेली आहेत व त्या अर्थी आपल्या मुस्लिम बांधवांना त्यांच्या धर्म संकटांत दूरएक प्रकारे योग्य ती मदत करणें हें मुस्लिमेतरांचे कर्तव्य आहे, | तसेच, ज्या अर्थी एप्रिल १९१९ मध्ये घडलेल्या अनेक गोष्टी विचारांत घेता सरकारने पंजाबच्या गरीब लोकांसंबंधी आपले कर्तव्य करण्यांत बेगुमान हेळसांड केली व त्यांचे रक्षण करण्यांत असमर्थता दाखविली, तसेच ज्या सरकारी लष्करी अंमलदारांनी शिपायाच्या इभ्रतीस न साजणारें असे रानटीपणाचे वर्तन केले त्यांना शिक्षा देण्यांत सरकारने कसूर केली, तसेच, जो सर मायकेल ओड्वायर सरकारी गुन्ह्याबद्दल व लोकांच्या अनन्वित हालअपेष्टांबद्दल बव्हंशी जबाबदार आहे व ज्याला या हालअपेष्टांची कधी खंत वाटली नाहीं त्या ओड्वायरला सरकारने बिनशर्त दोषमुक्त केले आहे त्या अर्थी, | या राष्ट्रीय सभेचे असे मत आहे कीं, उपरोक्त दोन अन्याय दूर झाल्याखेरीज हिदी जनतेस कदापि समाधान वाटणार नाहीं. राष्ट्रीय सभेच्या मते हे दोन अन्याय दूर करण्याचा व अशासारख्या अन्यायांना पुढे प्रतिबंध करण्याचा स्वराज्य स्थापणे हा एकच मार्ग आहे. वरील अन्याय दूर होईपर्यंत व स्वराज्य मिळेपर्यंत हिंदी लोकांनी महात्मा गांधीप्रणीत असहकारितेचा मार्ग अनुसरावा असे या राष्ट्रीय सभेचे मत आहे. [९३