पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वतंत्र मतदारसंघाचा उगम ३४१’ आले नाही याचे मला दुःख वाटते. सर्व कांहीं जितकें उत्तम व्हावयास हवें होतें तितकें उत्तम झाले आहे, आणि त्याने तुमच्या दर्जावर आणि व्यति गत अघिकारावर निर्णायक शिवकामोर्तब केला आहेआपण केलेल्या भाषणाच्या इतर चांगल्या परिणामांपैकी एक परिणाम म्हणजे इकडच्या टीका करणा-या पक्षाचे सर्व बेत आणि डावपेंच संपूर्ण उधळून टाकले गेले आहेत. म्हणजे असे की, यापुढे नकरशाही विरुद्ध जनता अशा अगदीं सामान्य पद्धतीने हिंदुस्थान सरकारचे वर्णन यापुढे त्यांना केव्हांहि करतां येणार नाही. मला अशी आशा वाटते की माझ्या कट्टर रॅडिकल (त्रान्ति-- कारक) मित्रांना देखील हा प्रश्न इतका साधा नाही असे दिसून येईल." [ ज्या १ ऑक्टोबर १९०६ रोजी वरील उद्यानोपहाराचा प्रसंग घडला त्याबद्दल खुद्द लेडी मिटो या लिहितात : ‘आजचा दिवस महत्त्व- पूर्ण आहे व याने हिंदुस्थानच्या इतिहासांत नवें पृष्ठ उघडलें आहे. हिंदुस्थानांतील इंग्रजांचे राजकारण 'फोडा व झोड ' या तत्त्वावर आधारलें होतें यांत शंका नाही. कारण ना. आगाखानांनीं हें मुसल मानांचे शिष्टमंडळ घेऊन यावें याची सूचनहि त्यांना लॉर्ड मिंटो यांचेकडूनच मिळालेली होती.] अभ्यास :-—१. हिंदुस्थानांतील जातबार मतदारसंघाचा उदय, वाढ व परिणाम यांचें चिकित्सक समालोचन करा. २. या घटनेने इंग्रजांना इतका आनंद कां झाला ? ८७