Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वतत्र मतदारसंघाचा उगम ४ स्वतंत्र मतदारसंघाचा उगम [ 'लेडो मिंटो यांची दैनंदिनी १ ऑक्टो. १९०६. लॉर्ड मिट यांचे न. आगाखानांना उत्तर : यांतील निवडक भाग-बानज भा. २ पृ. १३०]

  • आपल्या मागणीचा मी असा अर्थ समजतों कीं जेथे जेथे मतदानाचा

अधिकार लोकांस द्यावयाचे हे ठरविलें आहे अशा कोणत्याहि प्राति निधिक पद्धतीमध्ये, मग ती पद्धत म्युनिसिपालिटी, डिस्ट्रिक्ट बोर , किंवा कायदेकोन्सिल लागू यांपैकीं कक्षासहि असो, मुसलमान समाजास समाज म्हणून प्रतिनिधित्व मिळालें पाहिजे असा दावा आपल्या भाषणांत आपण मांडला आहे. तुम्ही असे दाखवून दिलेलेआहे की अनेक प्रसंगी प्रचलित घटनेप्रमाणे असलेले मतदार संघ मुसलमान प्रतिनिधी निवडून देतील अशी अपेक्षा करणे अशक्य आहे व जर यदाकदाचित् त्यांनी निवडून दिलाच तर त्याचे मत त्यांच्या जमातींतील बहुसंख्य मतदारांच्या मताविरुद्ध असेल; असे झाल्यास तो मुसलमान जमातीचा प्रतिनिधि ठरणार नाही. याखेरीज तुमचें असें न्याय्य मागणे आहे की, तुमच्या स्थितीचे मूल्यमापन फक्त तुमच्या संख्याबलावरून न करतां तुमच्या समाजाच्या राजकीय महत्त्वावरून आणि तुमच्या समाजानें बजावलेल्या साम्राज्याच्या सेवेवरून करण्यांत यावे. मागणीस तात्त्विक मान्यता मी संपूर्णपणे तुमच्याशी सहमत आहे. कृपा करून माझ्याविषयीं गैर- समज करून घेऊ नये. जमातींना प्रतिनिधित्व कोणत्या साधनांनी मिळेल हें दाखवण्याचा मी प्रयत्न करीत नाही, परंतु माझी अशी पक्की आहे खात्री आणि तुमचीहि तशीच असेल असा मला विश्वास वाटतो कीं, ज्या या देशांतील लोकसंख्या बनली आहे त्या जमातीच्या श्रद्धा आणि परंपरा विचारांत न घेतां नुसते दरमाणशीं मतदानाचे अधिकार देण्याने निवड णुकीच्या पद्धतीस अत्यंत अपायकारक असें अपयशच मिळेल. कारण हि स्थानांतील असंख्य जनतेला प्रातिनिधिक संस्थांचे ज्ञान नाहीं. [ ८५ जमातन