पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंगलची फाळणी ३३७ ५३ बंगालची फळणी [ केसरी, ता. १५-८-१९०५] अभिनवमदलेखाश्यामगंडस्थलानाम्। न भवति बिसर्ततुर्वारणं वारणानाम् । -भर्तृहरि शिरोभागीं निर्दिष्ट केलेल्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणे परकीय राज सत्तारूपी हत्ती हया देशांत जेव्हां मदोन्मत्त होऊन सर्वत्र संचार कई लागतो तेव्हां लोकमताच्या बिसनंतूचे त्याच्यापुढे कांह एक चालत नाही. संमतीवयाचे कायद्याचे उदाहरण ढळढळीत आमच्या डोळ्यांपुढे आहे ; आणि गेल्या सोमवार कलकत्त्यास झालेल्या प्रचंड सभेमुळे तोच प्रश्न पुन्हां उद्भवला आहेबंगाल प्रांताची बांटणी करून बंगाली भाषा बोलणारे राष्ट्र जरासंधा- प्रमाणे विभागून टाकल्याचे श्रेय बलभीम कडून घेण्यास उद्युक्त झाले आहेत, किंवा त्यांनी घेतले आहे असे म्हटले तरी चालेल. एकभाषा बोलणारे, एका आचारविचाराचे किंवा अनेक शतकें एकत्र राहिल्याने एकमेकांशीं ज्यांचे दळणवळण अधिक दृढ आहे अशा प्रकारचे लोक एका लेफ्टनंट गव्हर्नरच्य। किंवा गव्हर्नरच्या सत्तेखाली असल्यास त्यपासून राष्ट्राची अभिवृद्धि चांगली होते हैं तत्त्व आहे. लॉर्ड कडून यासहि हें तत्व मान्य नाहीं असें सवमान्य नाही. उलट त्यांचे असे म्हणणे आहे की, याच तत्त्वाच्या जोरावर आम्ही बंगाल प्रांताचे दोन विभाग करीत आहों. परंतु कडून साहेबांच ही कोटी चुकीची आणि मानभावीपणाची असून त्यांचा अंतस्थ हेतु किंवा कारणे याहून भिन्न असावी ही गोष्ट आकाशांतील सूर्याप्रमाणे आतां सर्व लोकांच्या ढळढळीत नजरेस आलेली आहेलपंडावाची वेळ आतां उरलेली नाह, किंवा त्याने कोणी फसूनहि जाणार नाही. शंभरांपेक्षां अधिक वर्षाच्या इंग्रजी शिक्षणाने बंगाली लोक इंग्रजी रीतीची चळवळ करण्यास शिकले आहेत , व यांची संघशक्ति जर अशीच कायम ठेविली तर यांच्या चळवळीस जोर मिळून पुढे मागें कदाचित् तिचा पगडा सरकारावरहि बसण्याचा संभव आहेहा परिणाम लॉर्ड कर्छन यांस नको आहेया बलभीम व्हाइसरॉयास [ ८३ '