पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रणी सरकारचा जयजयकार ३३५ बायका रस्त्याने जाऊ लागल्या की त्यांना गर्दातहि पुरुष वाट देत. त्या पहाटे पाण्याला जाऊ लागल्या क अंगणांत. अगर रस्त्यावर झोपलेली मंडळी डोक्यावर पांघरूण ओढून घेऊन झोंपत. कोणी बायकांचेकडे पाहण्याने यांना उपसर्ग पोचेल असे त्यांना वाटे व ते मोठ्या अदबीने वागत. अभ्यास : +‘रंगूबाईच्या वेळचे पुणे व आजचे पुणे' यांत दिसून येणान्या फरकावर चिकित्सक टिपण करा. रंगूबाईच्या मुलाखतींतील कोणत्या गोष्टी ऐकीव असतील व कोणत्या विश्वसनीय असतील, याची छाननी करा. ५२ : : : ९ राणी सरकारचा जयजयकार थे। [ केसरी, ता. २२ जून १८९७. अप्रलेख शेवटचा भाग ] वास्तविक म्हटले म्हणजे ही वेळ हिंदुस्थानांत तरी ज्युबिली करण्याची नव्हे असे कोणासहि खास वाटल्यावाचून राहणार नाही. आम्हीं दीन प्रजेनें देखील आमच्या महाराणी सरकारचा गौरव केला पाहिजे खरा, पण तो केव्हां ? कांहीं तरी सुवत्ता असतांन. हिंदुस्थानसरकारचे हुकूमहे थोडेबहुत अशा प्रकारचे आहेत, परंतु खालील अधिराज्यांच्या फाजील इच्छेने लोकांवर कांहीं ठिकाणीं निरर्थक खर्चाचा बोजा बसत आहे हें कांहीं चांगलं नाहीं. राज्यकर्याचे प्रजेसंबंधानें जें एक कर्तव्य आहे हे घडून न आल्यामुळे आमच्या जवळील जपानांत तीस वर्षात जी सुधारणा झाली नाही ती आमच्या दुर्दैवाने आमच्या शहण्या राज्यकर्यांच्या सांठ वर्षांच्या अमदानींतहि आम्हांस मिळाली नाही. करितां चक्रवातनी श्री महा राणी व्हिक्टोरिया यांस अमची हिंदुस्थानांतील लोकांच्यातर्फ अशी प्रार्थना आहे की, त्यांनों या महोत्सवाचे प्रसंग आपल्या या हिंदुस्थानवासी प्रजेस कांहीं तरी अधिक हक्क देऊन उत्कर्षा-- च्या मार्गास लावावें. इंग्रजी राज्याचा विस्तार मोठा आहे व त्याच्या राज्य- [८१