Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३२ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास रंगूबाई म्हणाल्या आमच्या सोमवारत त्या वेळी एका मारवाड्याने दोन मुलें मारली होती. तीं कां मारलीं हें कांहीं समजले नाही, पण मोठी गोंडस दिसणारी अशी ती मुले होतीं येवढे मला स्मरते. ती दुपारी खेळत असतांना त्यांचेवर या मारवाड्याने आरशाने प्रकाश पाडला आणि त्याच लक्ष आपल्याकडे वळवून घेतले व घरांत या म्हणून मुलांना बोलावून नेले. तेथे त्यांना तोंडात बोळा देऊन मारण्यांत आले असे सांगतात. पुढे ही दोन्ही मुलें सांडल्याचा जेव्हा ओरडा झाला तेव्हां या मारवाड्याने या मुलांची प्रेते एका पेटा-यांत घालून तो रेल्वे स्टेशनवर चालला होता. परंतु याच वेळा त्याला पकडण्यांत आले व असे क्रूर कृत्य केल्याबद्दल त्याला शनिवारवाडचापुढे फाशी देण्याची शिक्षा झाली होती. ढोलक्याने फाशीची वर्दी | पहाटे पाच वाजता ही फाशी देण्याची वेळ असे. या मारवाड्याला फाशी देण्याचा दिवस गांवांत ढोलके वाजवून जाहीर केला होता व आमच्याच पेठत हा गुन्हा झाला असल्यामुळे आम्हीं बायकाहि पण फांशी पाहण्यास गेलो होतो. शनिवारवाड्याच्या मोठ्या दरवाज्याजवळ उंच फळ्या मारून त्यावर या फासासाठी दोन खांब रोवले होते व या खांबांमध्ये असलेल्या आडव्या दांडीला एक दोर लोंबत असून त्याला एक पांढरी पिशवी लाविली होता पहाटेची वेळ असूनहि त्या वेळींहि फांशी पाहण्यासाठी शनिवारवाड्यापुढे चिक्कार गर्दी लोटली होती व कांहीं बायकाहि आपली लहान लहान मुले कडेवर घेऊन या मारवाड्याची फांशी पाहण्यासाठी आल्या होत्या. एका गो-या साहेबाने हत्यारबंद शिपायांचे पहाण्यांत या मारवाड्याला आणले । एकदम फळीवर चढविले. थोड्या वेळाने दोरीला लावलेली पांढरी पिशवी त्याचे गळ्यावर चढविली व त्याला खालचे खड्यांत लोटून दिले. त्यानंतर त्याचा कोणताच भाग आम्हाला दिसला नाही. फाशीची दोरी मात्र सारखा हलत होती. त्यावरून हा मनुष्य तडफडून मरत असावा येवढी मात्र चाग। कल्पना येत होती. च

७८]