पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पन्नास वर्षांपूर्वीचे पुणे ३३१ इंग्रजीत प्लेग किंवा ब्युबॉनिक फीव्हर हे नांव आहे. हा रोग फार प्राचीन काळीं इकडे माहीत होता किंवा नाहीं हें खात्रीने सांगता येत नाहीं. –केसरींतील निवडक लेख भाग १ ला, पृ. ५७४. अभ्यास : हा सर्वच लेख टिळकांच्या माहितीपूर्ण विवेचनाची साक्ष पटविणारा आहे । | ‘पन्नास वर्षांपूर्वीचे पुणे | [ पुणे येथील सुप्रसिद्ध दैनिक सकाळने ‘पन्नास वर्षांपूर्वीचे पुणे' या नांवाची एक लेखमाला इ. स. ४ मार्च ते ८ जुलै १९३९ पर्यंत प्रकाशित केली. याविषयासंबंधी भिन्न धर्माच्या भिन्न व्यवसायाच्या व परंपरेच्या १७ स्त्री-पुरुषांच्या मुलाखती या पत्राने प्रसिद्ध करून तत्कालीन समाजस्थितीची चित्रे लोकांपुढे कौशल्याने मांडली आहेत. त्यांतील २४ जून १९३९ च्या अंकांतील मुलाखतीचा कांहीं भाग पुढे दिला आहे. प्रारंभीं सकाळचा प्रतिनिधि लिहितो. : | ‘‘रंगुबाईचे वय आज कमीत कमी ९५ वर्षांचे असून जुन्या काळच्या गोष्टी त्यांच्या मनापुढे एखाद्या चलच्चित्रपटाप्रमाणे अगदीं ताज्या आहेत. रंगूबाई जवळ जवळ दीड तास बोलत होत्या. त्या काळच्या सुशिक्षितांत मिल स्पेन्सरचा प्रचार असल्यामुळे त्यांच्या आठवणींत पाश्चात्य संस्कृतीचीहि आठवण होते. परंतु रंगूबाईच्या जगांत निर्भेळ पुण्याच्या आठवणी आहेत. त्यांत राजकारण, समाजकारण यांचा संपर्क नाहीं. बहुजन समाज आणि त्यांतून स्त्रीसमाज कसा रहात असे याचे वर्णन त्यांच्याकडे मिळते. रंगूबाईची मुलाखत आटोपून उठतांना मला पन्नास वर्षांपूर्वीचे पुणे भेटले असे वाटलें."] । [ ७७