पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८९६ चा दुष्काळ फॅमीन रिलीफ कोडांतील कलम १५१ प्रमाणे ठिकठिकाणच्या पुढान्यांनी खटपट केली पाहिजे.* सरकार झाले तरी देवाप्रमाणे आहे. ते आपण होऊन कांहीं बोलत नाही, त्यांस कौल द्यावा लागतो; व कौल लावण्यास गुरवाची जरूर छागते व थोडासा धूपहि जाळावा लागतो. करितां फेमीन रिलीफ कोड लोकांनीं नीट समजावून घेतल्याखेरीज गरीब लोकांच्या जिवाचा कधीहि पूर्ण बचाव व्हावयाचा नाहीं; व येवढ्याचसाठीं पुणे सार्वजनिक सभेने " दुष्काळ निवारण्याचे मार्ग' या नांवाचे एक लहानसे पुस्तक प्रसिद्ध करून त्यांत आपल्या हलक्या पगाराच्या नोकरांकरितां, शेतक-यांकरितां, कारागिरांकरितां व शेतकीच्या जनावरांकरितां सरकार काय करीत आहे व काय करणार आहे याची थोडक्यात माहिती दिली आहे. हे पुस्तक मागवून घेऊन जर ठिकठिकाणच्या पुढारी लोकांनी आपापल्या तालुक्यांतील किंवा गांवांतील लोकांस माहिती करून दिली तर गरिबांचे जीव बचावल्याचे अंशतः तरी श्रेय त्यांच्या पदरी पडेल. लोकांनीं दुसरे असे लक्षांत ठेविले पाहिजे की, असले भयंकर दुष्काळ खाजगी धर्म केल्याने कधींहि टळत नाहींत. जेथे हजारो कोस प्रदेश व लाखों लोक दुष्काळाने ग्रासले, तेथे एखादा . धर्मात्मा फुकट अन्नछत्र काढून काय करणार ? हीं अन्नछत्रे काढू नयेत असे आमचे बिलकूल म्हणणें नाहीं. उलट ज्यास धर्म करण्याची शक्ति आहे त्यांस आमची अशी सूचना आहे कीं, हल्लींच्या सारखा लोकांस मदत करण्याचा प्रसंग क्वचितच येतो व (येऊहि नये); सबब असल्या प्रसंगी सर्वांनीं यथाशक्ति धर्म करून गरिबांचे संरक्षण केले पाहिजे. परंतु येवढ्याने कांहीं होत नाहीं. खरी तजवीज सरकारकडूनच झाली पाहिजे; व ती सरकार खुषी असले तरी त्यांच्या हातून करवून घेणें हें पुष्कळ अंशी लोकांच्या हातांत आहे। हे लोकांनी कधीहि विसरता कामा नये; व येवढयाच करितां आम्हीं केसरींतून त्यांस पुनः पुनः इशारा करीत आहों. | केसरीतील निवडक लेख, भाग १, पृ. ५८२ अभ्यास :-आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतरहि अशा उद्योगाची आवश्यकता आहे की नाही ? चर्चा करा.

  • ‘सोय करविली पाहिजे' असे पाहिजे.

। ७५