पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास मी जाणून बुजून पहिला मार्ग स्वीकारला असून त्याचे परिणाम काय होतील याबाबत भविष्यकाळावर माझा पूर्ण विश्वास आहे. अभ्यास :–हिंदुस्थानच्या राज्यकारभारांत उदारमतवादी व दडप शाहीचे धोरण ठेवणारे जे गव्हर्नर जनरल आलटून पालटून आले त्याचा नांवें सांगा व त्यांच्या घोरणांचे समीक्षण करा. ४९ । । । १८९६ चा दुष्काळ | [ केसरी–अग्रलेख ता. २४-११-१८९६ ] महाराणी साहेबांची जी इच्छा आहे कीं, दुष्काळांत कोणीहि उपाश। मरू नये, तो सफल होण्यास फारशी अडचण पडणार नाही सरकारची व लोकांची इच्छा या बाबतींत एकच आहे; व असल्य प्रसंगी दोघांचे कर्तव्यहि एक असल्यामुळे परस्पर विरोध येण्याचा संभव नाहीं. तथापि कित्येक प्रसंगी सरकार काय करणार, कि सरकारने काय केले पाहिजे, याचा लोकांस चांगलासा । नसल्यामुळे त्यांस जागच्या जागी उपाशी मरण्याचा प्रसंग या उदाहरणार्थ, आपण कामगारांची स्थिति घेऊ. फॅमीन रिलीफ कोड केल" १५१ यांत असे सांगितले आहे की, साळी व कोष्टी यांस दुष्का' कामगिरीवर खडी फोडण्यास न सांगतां त्यांच्याकरितां त्यांच्या धद्या कामें काढून त्यांस मदत करावी; व जरूर पडल्यास थोडीबहुत फुकट मदत द्यावी. हे कलम सरकारने नगर, सोलापूर, विजापूर व नाशिक जिल्हवांस लागू केले आहे, व तेथील कलेक्टरांस याप्रमाणें हुकूमहि आहेत. परंतु कलेक्टर नुसत्या हुकुमाने काय करणार? पैशांच्या म खेरीज साळयांकरितां काम त्याने कोठून काढावी ? यासाठी कोकास, गोष्ट मुद्दाम समजावून सांगून जेथे कोष्टी रिकामे पडले असतील तेथे त्या ७४] दिया हुकूमहि गेले