पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रशियाचे साम्राज्यबादी धोरण ३२५. तील सर्वात असंतुष्ट इसमासहि राज्यकत्र्यात बदल व्हावा असे वाटत नाहीं, याची शंका नको. इंग्रज जाऊन रशियन आले तर तेवढ्याने त्यांची दुःखें नाहीशी होणार नाहीत हे त्यांस पक्के माहीत आहे. रशियाने हा देश जिंकावा असे कोणासच वाटत नाहीं. परंतु रशियन अस्वलाची धडक जवळ आल्यास ब्रिटिश सिंहाच्या मनाचा, क्वचित् विसर पडलेला जन्मजात मोठेपणा जागृत होईल ( व त्या मोठेपणामुळे राज्यकर्त्यांचे हिंदुस्थानाबाबतचे धोरण बदलेल) एवढे मात्र त्यास वाटत असावे! ते कसेंहि असो, आम्ही आपल्या देशबांधवांस स्वच्छ बजावू इच्छितों कीं, इंग्रज राष्ट्राच्या कल्याणप्रद अंमलाखाली प्रजेस आज जे हक्क व कायदे मिळत आहेत तसे कोणत्याहि युरोपियन राष्ट्राच्या अंमलाखाली मिळणार नाहींत. हिंदुस्थानच्या तुकड्यासाठी ब्रिटिश सिंह व रशियन अस्वल यांची झुंज होणार नाही अशी आम्हांस आशा आहे. परंतु यदाकदाचित् तो दुदिन उगवलाच तर आमचे कर्तव्य स्पष्ट आहे. हिंदी संस्थानिक व प्रजा ब्रिटिश निशाणाखालीं एकत्र होतील व मास्कोवाल्यांस हांकून लावतील. सर्व बाजूंनीं विचार केला तर इंग्रजांना न्याय व निःपक्षपातीपणा यांची जेवढी मनापासून आवड आहे तेवढी युरोपांत कोणत्याहि राष्ट्रास नाहीं यांत शंका नाहीं. अभ्यास :–वरील लेखांत संपादकांनी आपली राज्यकर्त्यांबद्दलची राजनिष्ठा कशी कौशल्याने व्यक्त केली आहे ते पाहण्यासारखे आहे. इंग्रज जाऊन रशियन नको हे स्पष्ट म्हटले; पण इंग्रज जाऊन स्वातंत्र्य प्राप्त झाले, तर ते इष्ट कीं अनिष्ट याबद्दल कांहींच म्हटलेलें नाहीं. किंबहुना ते न, म्हणतांच कळावे असा लेखकाचा रोख असावा. [७१