पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०८ हिदुस्थानचा साधनरूप इतिहास गंगेच्या मुखाशी ब्रिटिश निशाणाचा अपमान झाला तर तो जणू काय इंग्लंडांत टेम्स नदीवरच झाला असे समजून त्या तीव्रतेने त्याचा प्रतिकार करावा. या तत्त्वावरहुकूम कोणत्याहि एतद्देशीय सरकारने ब्रिटिश नाग रिकांचा अपमान केला असता तर मीहि त्याबद्दल तत्काळ (नुकसान भरपाई) मागितली असती. ब्रह्म दरबारशी आपले असलेले संबंध व त्या सरकारचे आपल्याशीं दीर्घकाळचे वागणे लक्षांत घेतां त्या सरकारकडून होणान्य या पद्धतशीर तह-भंगाबद्दल आतां नुकसानी मागणं हिंदुस्थान सरकारला भाग पडले. ब्रिटिश व्यापान्यांनी यासंबंधी आपली रीतसर तक्रार आतां पुढ मांडली आहे. हिंदुस्थान सरकारचा ज्या पौर्वात्य राष्ट्रांशी संबंध आला त्यांत ब्रह्म लोक हे अत्यंत उद्भट, गविष्ठ व अहंकारी आढळले. १८२५ च्या युद्धाच्या पूर्वी दिसत असे, ती आज ब्रह्म सरकारच वति दिसत आहे युरोपांतील टीकाकारांना ब्रह्म जात ही कितीहि भुद्र वाटत असली तरी पूर्वेकडे त्यांना महाभयंकर समजतात. २५ वर्षांपूर्वी चितगांगकडे ते गेले असे समजतांच कलकत्याच्या बाजारात घबराट निर्माण झाली. गेल्या युद्धाच्या वेळींहि ते आले अशा वदंतेने आसाम आराकान भाग भयव्याप्त झाला. मित्रत्वाने भरपाई () मिळण्याचे यत्न केले. नकसान Reparation पण व्यर्थ....शेवट हिंदुस्थान सरकारने पेचूवर स्वारी केली आणि कांह आठवड्यांत ब्रह्मदेशाचा किनारा आपल्या ताब्यांत घेतला..(तरोहि आव्हाच्या राजाने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलें) .....शेवट १८५२ मध्ये पेशूच्या राज्याचा ब्रिटिशांनी ताबा घेतला. मनांत हेतु असा की, मागील अन्यायाची नुकसान भरपाई मिळावी आणि भावी कालांत ब्रह्म सरकारनें स्वस्थ रहावें. ब्रह्मदेशाशी युद्ध संपल्यापासून आतां हिंदी साम्राज्यांत सर्वत्र शांतता आहे. ज्या शहाण्या माणसाला पूर्वेकडील घडामोडींची माहिती आहे ते असे भविष्य कवींहि करू शकणार नाहीं की, आपल्या पूर्वेकडील सतत शांतता नांदेल. अनुभवानें, वारंवार येणान्या विचित्र व ताज्या अS भवानं असें शिकविलें आहे की आपल्याविरुद्ध बाहेरील युद्ध व अंतर्गत बंड ५४ ॥