पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रजीतूनच शिक्षण द्या ३०१ ......एका मुद्यावर सगळ्यांचे एकमत दिसतें कीं हिंदुस्थानच्या या भागांतील रहिवाशांच्या बोलभाषांमध्ये वाङमयीन अगर वैज्ञानिक माहिती नाहीं. इतकेच नव्हे तर त्या इतक्या दरिद्री आहेत की अन्य कोठून तरी (ज्ञानभांडार आणून) त्यांना समृद्ध केल्याशिवाय कोणताहि महत्त्वाचा ग्रंथ त्यांत अनुवादित करतां येणे अवघड आहे. उच्च अभ्यास करणा-यांचे सामर्थ्य असलेल्यांची बौद्धिक उंची वाढविण्याचे आजचे साधन म्हणजे मातृभाषा व्यतिरिक्त कोणती तरी अन्य भाषा त्यांना शिकविणे. | मग ही भाषा कोणती असावी? कमिटीच्या अध्र्या सभासदांचे मत आहे कीं ती इंग्रजी असावी, उरलेल्यांचा जोरदार आग्रह अरबी व संस्कृतचा आहे. मुख्य प्रश्न हा कीं कोणती भाषा माहीत असणे मोलाचे आहे ? मला अरबी, संस्कृत येत नाहीं... पण सुप्रसिद्ध संस्कृत अरबी ग्रंयांची भाषांतरें मी वाचली आहेत. संस्कृत व अरबी भाषांतील सगळे वाङमय एकत्र केले तरी ते फार तर चांगल्या युरोपियन ग्रंथांतील एका कपाटांतल्या फळीवर मावणाच्या ग्रंथांतील ज्ञानाएवढे भरेल. सध्या मातृभाषेतून ज्यांना ज्ञान देता येत नाहीं अशा लोकांना आपणांस शिक्षण द्यावयाचे आहे. त्यांना कोणती तरी परकीय भाषा शिकवली पाहिजेच. आपल्या भाषेच्या या अधिकाराबद्दल पुनः सांगण्याची गरज नाहीं. पाश्चिमात्य राष्ट्रांत सुद्धा ती महत्त्वाची भाषा आहे. हिंदुस्थानांत राज्यकर्त्यांची इंग्रजी हीच भाषा आहे. राजधानीतून एतद्देशीय लोकांतील वरचा वर्ग ही भाषा बोलतो. पूर्व समुद्रांतील व्यापाराची भाषा तीच होण्याचा संभव आहे.. ....पश्चिम युरोपीय भाषांनी रशियाची सुधारणा केली. तार्तर लोकांच्यासाठी या भाषांनी जे केलें तेच हिंदूंकरितां ही भाषा करील यांत मला संशय वाटत नाहीं. .....एतद्देशीयांना इंग्रजीत तज्ज्ञ करता येणे शक्य आहे आणि याच दिशने आपले प्रयत्न झाले पाहिजेत. मर्यादित साधनांनी सर्व समाजाला आपण शिक्षण देऊं शकणार नाहीं. आपण असा एक वर्ग निर्माण करण्याची शिकस्तीची खटपट केली पाहिजे कीं जो आपण आणि ज्या असंख्य लोकांवर आपण राज्य करतो त्यामध्ये [ ४७