पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास मी एक भाग आहे त्या सरकारला मिळावे ही माझी महत्त्वाकांक्षा असणे यांत कांहींच अप्रामाणिकपणाचें नाहीं. अभ्यास :-सतीच्या चालीबद्दल तुमची विचारसरणी सांगा. लॉर्ड वेंटिकच्या पुर्वी सतीची बंदी कोणत्या राज्यकत्र्यांनी केली होती काय : बेंटिकच्या धोरणाने ब्रिटिश राज्यास धोका आला कीं बळकटी आली ? इंग्रजीतूनच शिक्षण द्या ए मिनिट बाय ? मि. टी. बी. मेकॉले, ( २ फेब्रुवारी । १८३५ | [ गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचा कायदे-मंत्री म्हणून या वेळीं मेकॉले हिंदुस्थानांत आलेला होता. युरोपियन विज्ञान व पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण' हे हिंदुस्थान सरकारने संस्कृत व अरबी या भाषांतून द्यावे की इंग्रजीतून द्यावे असा वादाचा प्रश्न उत्पन्न झाला. ‘कमिटी आफू पब्लिक इन्स्ट्रक्शन' पूर्वीच नेमलेली होती, तिच्या सभासदांत या मुद्यावर मतभेद माजला होता. दोन्ही पक्ष तुल्यबळ होते. कंपनीला पार्लमेंटने १८१३ च्या कायद्याने जे अधिकार दिले त्याअन्वये इंग्रजी भाषा माध्यम करता येणार नाहीं असें कांहीं सभासदांचे मत होते, यामुळे बहुधा हा प्रश्न कायदेमंत्री मेकॉलेकडे विचारार्थ आला. त्याच्या उत्तरांतील महत्त्वाचा भाग पुढे दिला आहे. त्या वेळचा गव्हर्नर जनरल लॉर्ड वुल्यम बेंटिंक यानें मेवॉलेचे भत बरोबर असल्याचा निर्णय दिला व हिंदुस्थानांत इंग्रजी माध्यमांतून शिक्षण सुरू केले. आतां स्वराज्य आले तरी हे माध्यम जाईल की नाही याची शंका वाटते.--मूर,पृ.११० ] ....या कायद्याचा जो अर्थ अभिप्रेत आहे असे कांहीं जणांचे म्हणणे आहे, त्याप्रमाणे कोठल्याहि अर्थ लावण्याच्या पद्धतीने तसा अर्थ काढतां य३ असे मला वाटत नाही. त्यामध्ये विशिष्ट भाषा किंवा शास्त्रे शिकवा असे सांगितलेले नाहीं. हे माझे म्हणणे कौन्सिलला पटले नाहीं तर ज्या वाक्यांशामुळे ही अडचण निर्माण होत आहे तो वाक्यांश काढून टाकणा कायदाच मी मांडीन...ही लाख रुपयांची गॅट चांगल्या रीतीने कशी उपया वयाची हा खरा प्रश्न आहे. ले [४५