पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सती बंदीचा कायदा २९९ करण्याच्या आशा धुळीला मिळविण्यासारखे आहे. हा पर्याय म्हणजे मानवतेच्या दृष्टीनेंहि जास्त अपायकारक आहे....उलट-एक एक दिवस उशीर म्हणजे भयंकर बळींच्या यादींत वाढ करणे होय....सतीबंदीमुळे होणा-या भीषण परिस्थितिबाबत हिंदू कॉलेजचे सेक्रेटरी मि. होरेस विल्सन यांच्या मताला मी विशेष मान देतों. | त्यांचा पहिला मुद्दा असा : 'खरोवर सती हा हिंदुधर्माचा भाग नाहीं' असे सिद्ध करण्याचा यत्न करणे म्हणजे खरा प्रश्न डावलणे होय. कारण हिंदु धर्मात काय आहे यापेक्षा त्यासंबंधी लोकांचा समज काय आहे हेच महत्त्वाचे आहे हे म्हणणे मला मान्य आहे. दुसरा मुद्दा : हो चाल बंद करण्याने विस्तीर्ण (प्रदेशभर) असमाधान पसरेल हेंहि मला मान्य आहे. त्यांचे म्हणणे असे कीं (या प्रयत्नांत) फारच थोडे यश येईल. हे मात्र मला शंकास्पद वाटते...एतद्देशीयांतील सुशिक्षित (गृहस्थ) राजा राममोहन रॉय, यांना सतीची चाल बंद व्हावयास हवी, पण तेहि म्हणतात की, “सरकारने तसा कायदा केला तर लोक बिथरतील....ते म्हणतील की जेव्हां राजसत्ता मिळवावयाची होती तेव्हां आमच्या धर्माचा इंग्रजांनीं मान ठेवला व सहिष्णुता दाखविली, पण आतां सर्वसत्ताधीश झाल्याबरोबर त्यांचे पहिले कृत्य. म्हणजे (धार्मिक) बाबींतील तटस्थ वृत्तीचा त्याग. ...मुस्लीम विजेत्याप्रमाणे याच्या पुढची पायरी म्हणजे त्यांच्या धर्माची जबरदस्ती आम्हांवर होणे हीच होय." | " आतां कौन्सुिलपुढे सतीची चाल बंद करण्याचे बिल मी मांडत आहे. निजामत अदालत मधील सर्व न्यायाधीशांचा मला पाठिंबा असलेले पत्र सोबत आहे... हिदंचे कल्याण हाच माझा सर्वोच्च हेतु आहे. धार्मिक श्रद्धा आणि आचार यांचा आणि माणूस मृत्यूच्या तोंड देणे याचा विरोध आहे हे समजावून देणे ही पहिली पायरी होय. मग लोक या प्रश्नाचा शांत मनाने विचार करू शकतील. धर्मांतर घडवून आणण्याचा विचारसुद्धां माझ्या मनाला शिवत नाहीं. मी हिंदूंच्या करितां कायदे करीत आहे ही माझी भावना आहे, आणि मला माहीत आहे की कित्येक प्रगत हिंदूंनाहि असेच वाटते. .....ब्रिटिश राज्यावरील हा डाग धुऊन काढण्याचे श्रेय ज्या सरकारचा [४५