पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रजी राज्याचे फायदे : राजा राममोहन रॉय यांचे विचार २९७ २६ । । । इंग्रजी राज्याचे फायदे : राजा राममोहन रॉय यांचे विचार इ. स. १८२९ [ राजा राममोहन रॉय (इ. स. १७७४ ते १८३३) याची योग्यता अद्याप मराठी वाचकांस पूर्णपणे कळलो नाहीं. त्याने प्रथम वेदांचे बंगालीत भाषांतर केले. हिंदु कॉलेजची स्थापना केली. तिवेटांत जाऊन धर्माचा तौलनिक अभ्यास केला. इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला. सती विरुद्ध मोहीम केली. विधवाविवाहाची, स्त्रियांस शिक्षण देण्याची व स्त्रियांना वारसा हक्क असण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. बहुपत्नीकत्वास विरोध केला. मुद्रण स्वातंत्र्याचा आग्रह धरला. ज्युरींतील वर्णभेदाचा निषेध केला. सनदशीर चळवळीचा पाया घातला. व्यक्तिस्वातंत्र्य व लोकशाही याचा उच्चैष केला. जमीनदारी जुलुमाविरुद्ध रयतेची वकिली केली व सरकारच्या करपद्धतीत समतेच्या तत्त्वावर सुधारणा करण्याचा आग्रह धरला. सारांश भूतदया, स्वातंत्र्याची आकांक्षा व शास्त्रीय दृष्टि या त्रयीच्या आधारावर भव्य व मनोहारी 'नवभारताचा निर्माता' हे अभिधान त्यास सार्थकतेनें लागू पडते. अशा या राजा राममोहन रॉयचे प्रारंभींचे विचार पुढे दिले आहेत. व्हिक्टर जेकिमो नांवाचा फ्रेंच शास्त्रज्ञ त्यास भेटला असतां त्याच्याशी झालेल्या संभाषणाचे टिपण जेकिमोने पुढीलप्रमाणे केले आहे. मुजुमदार, पृ. ४१.] राजा राममोहन रॉय याच्याशी झालेल्या संभाषणांत त्याच्या विचारांचा मोठेपणा व प्रांजळपणा पाहून मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "माझ्या लहान वयांत या युरोपबद्दल मला फार तिरस्कार वाटे. कारण या यरोपांतल्याच एका देशाने माझ्या देशास गुलाम केलें." तारुण्यांतील अंध देशभक्तीमुळे त्यास इंग्रजांबद्दल व त्यांच्याबरोबर जे कांहीं आलें त्या सर्वांबद्दल मोठा तिरस्कार वाटे. परंतु दिवसेंदिवस इंग्रजी सत्ता प्रस्थापित झाल्याने हिंदुस्थानास झालेल्या फायद्यांची त्यास जाणीव झाल्यापासून त्याच्या वतींत फरक पडं लागला. तो म्हणाला, आपण सर्व मानव जर या सृष्टीतील वस्तुमात्रांवर अवलंबून आहोत व त्यांच्यावाचून आपले चालत नाहीं तर अशा [४३