पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९६ - हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास करण्यास समर्थ करावे, या प्रकारचे धोरण अधिक बरोबर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हां हिंदुस्थानांतून आपला अंमल नाहींसा होईल तेव्हां आपल्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजे तेथील दीनदुबळी प्रजा, खुरटलेली व निःसत्त्व झालेली अशी असण्यापेक्षां ते आपला कारभार पाहण्यास अधिक समर्थ झालेले आहेत हे दृश्य दिसावे. यासाठी आपण कोणते उपाय योजले पाहिजत त्याचा आपणास अनभव नाहीं व हिंदी लोकांशी आपला तेवढा परिचयात नाहीं; परंतु हिदी लोकांची उंची वाढविण्याचा एक उपाय म्हणजे त्यांच्या अधिकाधिक आत्मविश्वास उत्पन्न करावा, त्यांच्यावर विश्वास टाकावा सरकारच्या कक्षेतील कोणत्याहि अधिकारावर येण्यास ते पात्र असा अशा प्रकारचे धोरण ठेवावे. हे धोरण अमलात आणण्यास कांहीं मया असतील, परंतु जेथे आपला अंमल धोक्यांत येण्याचा प्रश्न नसेल तेथे हि लोकांना नेमण्यास कोणताच प्रत्यवाय असू नये. निदान मला तरी अत' प्रत्यवाय ठेवण्याचे कारण दिसत नाहीं. हिंदुस्थानांतील ब्रिटिशांच्या अंमलाकडे एक तात्पुरती घटना म्ह" तुम्ही पाहूं नका. हिंदी लोकांच्या भोळ्या व धर्मनिष्ठ समजुती नाह होऊन ते आपल्या देशाचा राज्यकारभार हाती घेण्यास समर्थ होई तो आपण तेथे राहावयाचे व ते एकदां सुशिक्षित झाले म्हणजे आपण ' काढता पाय घ्यावयाचा, हे धोरण आपण अंमलात आणल्यास हिदी ला मानसिक व बौद्धिक उंची वाढेल व ते आपला आपण कारभार करण्य स्वत:चे संरक्षण करण्यास समर्थ होतील. | अभ्यास :-मन्रोची भविष्यवाणी खरी ठरली काय ? इंग्रजी हिंदुस्थान कोणत्या स्थितींत सोडला ? कांची रभार करण्यास व