________________
२९४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास २४ । । पेशव्यांचे संस्थानहि कां ठेवलें नाहीं ? | ई. ई. के. पेपर्स पी. एम. मराठा वॉर्स } | २० जून, १८१८ [ माक्विस ऑफ हेस्टिग्जने कोर्ट ऑफ डायरेक्टरला लिहिले. –मूर, पृ. २७४ ] प्रत्येकास असे दिसेल की कसल्याहि अटी घालून मुद्धां बाजीरावाची पुनः स्थापना करणे हे आपला मान व सुरक्षितता याच्याशी विसंगत आहे. नवीन सरकारच्या ताब्यांत प्रदेश यावयास हवा.... तुमच्या वर्चस्वाखालीं तो यावयाचा नसेल तर मसनदीवर बाजीरावाच्या घराण्यांतील कोणास अगर तिन्हाइतासच बसविला पाहिजे. पहिल्या प्रकाराबाबत हे सिद्ध करण्यास आपल्याजवळ पूर्ण आणि भरपूर पुरावा आहे कीं वाटेल ती बंधने घातली तरी इतर मराठे राजाकडून गुप्तपणे आपल्याशी राजनिष्ठ राहण्यास पेशव्याने त्यांना सांगितले तर त्यास आपण अडथळा करू शकणार नाही. आणि पुराव्याने सिद्ध केले आहे की आपल्याला दिलेल्या वचनांना हरताळ फासून मराठ्यांच्या (IIead 0 Mahrattas) मुख्याच्या आज्ञांचे पालन केले जाईल... म्हणून पेशवा नका: तिन्हाइतालाहि (गादीवर बसविणे) नकोच. कारण त्याची स्वाभाविक परिणत म्हणजे त्यामुळे खालच्या वर्गात क्षोभ निर्माण होईल आणि मोठ्या सरदारात विद्वेष उत्पन्न होईल..... अशा प्रकारचे असमाधान तुमचे सरकार झाल्यास होणार नाहीं. लगतच्या कंपनीच्या प्रदेशांत प्रजेला जी सुरक्षितता व सौम्य मिळते त्याची जाणीव (इकडील) रहिवाशांनाहि आहे. तसे कंपनीचे राज्य झाले तर वाईट वाटणार नाहीं, किंबहुना हेच लोकांस पाहिजे आहे अश। उत्सुकतेचे प्रत्यक्ष दाखले त्यांनी दर्शविले आहेत. ...म्हणून निर्णय असा की, तुम्हालाच हा प्रदेश तुमच्या ताब्यात घ्या लागेल. तुमच्या शस्त्रांनीं जें महत्कार्य केले त्यानंतर शांततेचे कार्यहि तुम्ह केले पाहिजे, असेच तुम्हांस वाटेल; कारण कीं हो एक सुदैवी संधि अ आहे की ज्यामुळे सामाजिक तत्त्वे व कर्तव्ये यांची कल्पना नसलेल्या यथा समाजांत नीति वा शिक्षण यांचा प्रथमच प्रचार करता येईल. मान