पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३१९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कायमधान्याच्या पद्धतीवर सर चार्ल्स मेटकाफ् याची टीका २९१ जमीनदारांना सोईचे वाटतांच ते जुन्या मालकांचे हक्क नष्ट करू शकतील यांत शंका नाहीं. डायरेक्टर बोर्डाने बंगाल्यांतील कायमधान्य च्या पद्धतीसंबंधी प्रशंसा करतांना त्या पद्धतीचा संस्थापक लॉर्ड कॉर्नवॉलिस यास 'शेत जमिनीवरील खाजगी मालमत्तेच्या कल्पनेचा उत्पादक' असे गौरवून म्हटले. खरोखर लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पूर्वी हि हिंदुस्थानांत (शेतजमिनीबाबत) खाजगी मालमत्तेची कल्पना अस्तित्वात होतीच. कायमधाच्याच्या पद्धतीने जर कांहीं केले असेल तर तो नष्ट करण्याचा पाया घातला असे म्हणता येईल. लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. त्याचे हेतु शुद्ध होते यांत शंका नाही. त्याने घालून दिलेल्या पद्धतीने आज रयतेवर होणारे अन्याय चाल राहावेत असे त्याच्या मनांतहि नव्हते. पण डायरेक्टर बोर्डाचे अनुकरण करून मला जर लॉर्ड कॉर्नवॉलिसला एखादे प्रशंसापत्रक द्यावयाचे असेल तर मी असे म्हणेन कीं, जो खरोवर सरकारचा वसूल त्याची त्याने खाजगी मालमत्ता केलो व जी खरोखर खाजगी मालमत्ता होती ती त्याने पूर्ण नष्ट केली. आणि हे करीत असतां हजारों, लाखों लोकांचे जमिनीचे मालकी हक्क बुडविले व मूठभर उपटसंभ असे नवे जमीनदार निर्माण केले !' अभ्यास :--बंगालमधील जमीनदारीसंबंधीं सर रमेशचंद्र दत्त आदींची मते समजावून घ्या. आज तुम्हांस या पद्धतीसंबंधी काय वाटते ?