Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९० २९० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास २१ । । कायमधान्याच्या पद्धतीवर सर चाल्से मेटका याची टीका [पुढील उतारा, ‘मेटकाफच्या कागदपत्रांतील निवडक उतारे' या ग्रंथांतून पृ. २५३ वरून घेतला आहे. सर चार्लस् मेटकाफ हा माक्विस। ऑफ हेस्टिग्जचे वेळीं कर्तवगार अधिकारी म्हणून प्रसिद्धीस आला व इ.स. १८३५ सालीं बेंटिंकनंतर कांहीं काळ गव्हर्नर जनरलहि झाला. इ.स. १८१८त मराठ्यांचा संपुर्ण पाडाव झाल्यावर उत्तर हिंदुस्थानांत स्थिरस्थावर करण्यांत याचा मोठा भाग होता. कायमच्या जमीनदारी पद्धतीवर त्याने त्याच वेळी घेतलेले आक्षेप आजहि वाचण्यालायक आहेत. -मूर १११.] बंगाल्यांत कायमधारयाची पद्धत अंमलात आल्यापासून त्या प्रान्तांतील जमिनींची लागवड वाढलेली आहे यात शंका नाहीं, परंतु तेवढयावरून दूसरी एखादी पद्धत अंमलांत असती तर अशीच लागवड वाढली नसती अस कांहीं म्हणता येत नाहीं. पश्चिमेकडेहि आपण जिंकलेल्या प्रदेशांतहि जमिनीची लागवड वाढलेली आहे. ती किती प्रमाणांत वाढली, त्यांत बंगाल इतकीच वाढ झाली की नाही हे सांगण्यास मजजवळ पुरावा नाही. परंतु पुष्कळच वाढ झालेली आहे. या प्रांतांत बंगालपेक्षांहि लागवडीस अडचणी अधिक, हे लक्षात घेतां झालेली वाढ आश्चर्यकारक आहे. मी असेहि घटकाभर धरून चालतों कीं कायमधारयाच्या पद्धतीमुळे अधिक लागवड झाली असेल. | परंतु या कायमधान्याच्या पद्धतीसाठी आपण केवढी किंमत दिला याचा कांहीं विचार केला आहे काय ? या पद्धतीमुळे व लागवडींत कितीह वाढ झाली तरी त्यामुळे होणा-या वसुलाच्या सर्व वाढीवर सरकारने कायमच पाणी सोडले. हे केवढे तरी नुकसान ! पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणज आम्हीं रयतेचा जमिनीवरील मालकी हक्क सर्वस्वी नष्ट केला व तो का। थोड्या उपरी जमीनदारांस देऊन टाकला. आतां सरकारी कायदा काह करो, हिंदुस्थानांतील प्राचीन संस्था देशांत इतक्या बद्धमूल आहेत की रयत सर्व हक्क अजिबात नष्ट झाले असतील असे म्हणवत नाहीं. व नवीन जमा दारांनाहि तसे ते नष्ट करणे सोईचे नसेल. परंतु वेळ येतांच व या नवा"