पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८९ टिपूवर विजय २० । । । . महादजी शिंदे यांची कागद पत्रे नं. ६०५ } | महादजीकडून आभनंदन टिपूवर विजय { ३ एप्रिल १७९२ श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-- छ विनन्ती सेवक महादजी शिंदे कृतानेक विज्ञापना स्वामींनीं कृपा करून पत्र छ २७ रजबचे पाठविलें तें पावोन संतोष जाहला. राजश्री हरि बल्लाळ व निजामअल्लीखान बहाद्दर याचे :पुत्र पोलादजंग व इंग्रज मिळोन फौज सुद्धा पट्टणा* नजीक तीन कोसांवर गेले. तेथून छ. १३ जमादिलाखो रात्रीस इंग्रजांनीं सड़ी पंधरा पलटणे तोफा खेरीज घेऊन पुढे चालोन गेले. टिपूस खबर कळली. तोही तयार होता. इंग्रजांची व टिपूची लढाई होतच आहे, तो सरकारची व नवाबाकडीलहि फौज जाऊन पोहचली. टिपू माघारा हटून गेला. नंतर टिपुर्ने सलूखाचा पैगाम लाविला. वकील पाठविले. त्यांसी सरकार व नबाब व इंग्रज मिळोन बोलणे होऊन तहाचा जाबसाल ठरला. टिपूकडील मुलकापैकी निमे मुलुक व तीन क्रोड रुपये तिन्ही सरकारांस द्यावे या प्रमाणे ठरोन, सदरहू जाबसालाचा फडशा होय तोंपावेतों टिपूचे दोघे पुत्र ओलीस ठेवावे असे ठरले. त्याप्रमाणे दोघे पुत्र ओलीस आले, येऊन भेटले. याप्रमाणे हरि बल्लाळ याजकडून पत्रे आली. तुम्हांस कळावे याकरिता लिहिले आहे म्हणोन पत्रों आज्ञापिलें. ऐसियास, टिपु पैकेपूर, यामुळे उन्माद होऊन अलीकडे अमर्याद वर्तणूक करू लागला. त्यावरून त्याचे पारपत्याचा विचार सरकारांतुन नबाब, इंग्रज यांच्या फौजा सरकार फौजेस सामील करून ठरला....टिपूचा सरंजाम जंगी मातबर असतां व पट्टण त्याची रहावयाची जागा, कलब' तेथवर फौजा जाऊन लढाई केली पट्टणानजीकच्या बातेच्या घेतल्या, आणि शत्रूस जेर केला. हा प्रताप एक स्वामींचाच..... लिहून कळविणार स्वामी समर्थ आहेत. रोवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

  • श्रीरंगपटण. १ वोलणे. २ मसुदा. + ७ फेब्रुवारी १७९२. ३ येथपर्यंत मूळ पत्र, ज्यास हे पत्र उत्तर आहे ते. ४ भरपुर पैसेवाला. ५ काळीज. ६ बॅटरी, मोर्चे बांधलेल्या तोफा.

[ ३५