पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३०१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राज्य बाढविण्यासाठी सैन्य पाठवा २७३ जाऊन त्या जागीं सौम्य पद्धतीचे (इंग्रजी) राज्य आले तर त्यांना आनंदच वाढेल. जर कंपनीने मोगल बादशहाला वसूलीपैकीं द्राविक रक्कम म्हणजे पन्नास लक्ष रुपये देण्याचे कबूल केले तर आपणाला बादशहापासून अधिक काराची सनद मिळण्याला मुळीच अडचण पडणार नाही. ३तकेच काय, दिल्ली येथील राजदरवाराकडून मला वसूली खात्याचे अधिकार आपल्या तान्यांत घेण्याबद्दल विनंत्याहि आल्या आहेत. परंतु नबाबाला मत्सर बाढू लागेल अशी कोणतीहि गोष्ट करण्यास मी. सध्यां नाखूष आहे, त्यामुळे मी हा मागीला नकार दर्शविला आहेविशेषतः एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी आज कंपनीकडून मला सैन्याची पुरेशी मदत मिळण्याचा संभव नाही. परंतु एवढे सांगतों क आज ही जबाबदारी घेतलो तर यांतूनच उद्यां प्रांताची सुभेदारी मिळण्याचा मार्ग खुला होईल. ......वाषिक वीस लक्ष पौंडांपेक्षां अधिक उत्पन्नाच्या निसर्गसंपन्न प्रदेशा वर स्वामित्व मिळण्याचा संभव इंग्लंडांतील जनतेने डावलण्याजोगा आहे काय याचा तुम्ही विचार करा. हा प्रांतांचा ताबा घेण्यामुळे साम्राज्याला बरीच मोठी संपत्ति मिळण्याचा संभव आहे व आपल्याला झालेले भयंकर कर्ज फेडण्याच्या दृष्टीनें बराचसा उपयोग होईल. इंग्रजी. सैन्य थोडं आलें तरी पुरें. आहे, कारण येथील काळचा पलटणींना येथील राज्यकर्यांकडून मिळणार्या पगारापेक्ष आम्हीं जास्त पगार देतों व जास्त चांगल्या तर्हेने वागवितों त्यामुळे वाटेल तितके वाळे सैनिक आम्हांस सहज मिळू शकतात.. तुमचा अत्यंत नम्र सेवक, ० राबर्टक्लाइव्ह [ १९