पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचा सघनरूप इतिहास अस्ताव्यस्त सामान, बंदुका, दारूगोळा वगैरे त्यांना लुटून नेले. या एकंदर । हल्ल्यांत ४५ यूरोपियन व ३० शिपाई मारले गेले व कित्येक जखमी झाले. अशा रीतीने हा ५० दिवसांचा वेढा संपला. सर्व परिस्थिति प्रतिकूल असतां या धाडशी कप्तानाने (क्लाइव्हने) अविश्रांत श्रमानें, चिकाटीने व धैर्याने आपल्या मूठभर साथीदारांसह हा विजय मिळविला. क्लाइव्हला लष्करी विद्येचे पूर्वीचे कसलेही ज्ञान नसतां एखाद्या सराइताप्रमाणे आपल्या जवळच्या सामुग्रीचा त्याने व्यवस्थित उपयोग केला. अभ्यास :-प्रत्यक्ष लढाईचे हे वर्णन वाचन हिंदी शिपायांचे शौर्य, शिस्त, तारतम्य यांवद्दल तुम्हांस काय वाटते ? या लढाईत परच शिपाई कसे वागले ? कलकत्त्याची अंधारकोठडी | [ कलकत्त्याच्या अंधारकोठडी संबंधी हॉलवेलने केलेली विधाने अतिशयोक्तिपूर्ण आहेत हे मेजर बसू यांनीं 'राइज ऑफ रिश्चन पॉवर इन् इंडिया' या ग्रंथांत दाखविले आहे. तरीपण समकालीन कागदपत्रात हाच अतिशयोक्त वर्णनाचा प्रकार प्रसूत होता असे दिसते. तथाकथित अंधारकोठडीचा प्रकार २० जुन १७५६ रोजी कलकत्यास घडला. त्यासंबंधीं नजीकच्या चंद्रनगर येथील फ्रेंच कौन्सिलने १६ डिसेंबर १७५६ रोजी आपल्या वरिष्ठास जें पत्र लिहिलें त्यांतील उतारा पुढे दिला आहे ता. १७ डिसेंबर रोजी खुद्द क्लाइव्ह व बॅटसन यांनीं नबाबास पत्रे लिहिली त्यांत नबाबाकडे कंपनीच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. पण या पत्रांतहि अंधारकोठडीचा किंवा खोला। कोंडून माणसे मारल्याचा उल्लेख नाहीं हे लक्षात ठेवले पाहि यावरून समकालीन नजोकचा अस्सल पुरावाहि विश्वसनीय मानण्य पूर्वी तो नीट पारखून घेतला पाहिजे हे लक्षांत येते. मुर, पृ. ४१-४३.. मित्रहो ! तुम्हांस मी एक आश्चर्यकारक घटना सांगतो. बंगार नुकतीच एक मोठी क्रांति झाली व इंग्रजांचे त्यांच्या वसाहतींतून जवळ उच्चाटन झाले. त्याच्या बनावाची हकीकत पुढीलप्रमाणे आहे : | १२] दतीतून जवळ जवळ