पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गार्डनला सूचना २६३ त्याने नागवणूक केलेली आहे. या दुष्ट व्यसनापासून सावध रहा असे आमचे तुम्हांस कळकळीचे सांगणे आहे. के. सिटननेंहि हे ध्यानात ठेवावें की त्याने हा दुष्ट प्रकार बंद केला नाही तर त्याला तेथे राहाता येणार नाहीं व तेथून दूर घालविले जाईल. मद्रासच्या कुलीन स्त्रियांनाहि सामोपचाराने हे सांगावें कीं हें व्यसन त्यांना घातक व त्यांच्या स्वकीयांसंबंधी मत कलुषित करणारे असल्याने त्यांनी या व्यसनापासून अलिप्त रहावे. | अभ्यास :-परदेशांत नवीनच राहावयास जाणाच्या तरुणांबद्दल कोणती काळजी घेतली पाहिजे ? हल्लीचे हाय कमिशनर परदेशस्थ हिंदी लोकांबद्दल अशी काळजी घेतात काय ? । | ७ : मुंबईच्या गव्हर्नराने मराठ्यांच्या दरबारी पाठविलेल्या कॅप्टन गार्डनला दिलेल्या सूचना [इ. स. १७३९] --मराठे व इंग्रज. पृ. ३७ | " सोबतची पत्रे व नजराणे नेहमींच्या शिरस्त्याप्रमाणे आदबशीर रीतीने ज्यांचे त्यास द्यावे. शाहू राजाच्या दरबारी त्याचे मुख्य सल्लागार कोण, त्यांचे विचार काय आहेत आणि त्यांचे हिताहितसंबंध कसे काय आहेत याची चौकशी करावी. बाजीरावाचे शत्रु दरबारी पुष्कळ आहेत; यामुळे योग्य प्रसंग पाहून त्याच्या विषयी त्यांचे मनांत स्पर्धा व हेवा उत्पन्न करावा, तो आधीच प्रबल असून पोर्तुगीजांवर जय मिळविल्याने तो आणखी प्रबळ होणार; त्याच्या वर्चस्वाला आळा घालावयाचा तर हीच वेळ आहे, असे त्यांचे मनांत भरवून द्यावे. आपला कमकुवतपणा त्यांना फारसा दाखवू नये. बाजीरावास आम्ही भीत नाहीं. आमच्यावर त्याने स्वारी केली तर आम्हांस आपला बचाव करता येईल असेच त्याने भासवावे. आमचा मतलव मुख्य व्यापाराशीं, आम्हांस कोणाचा मुलूख नको, आम्ही कोणाच्या धर्मात हात घालीत नाही. या देशांत खपून उरणारा तुमचाच माल आम्ही १७ सा. इ.