पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२८९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

{ सतराव्या शतकांतील प्रवास २६१ | याहून अधिक मुखाचें वाहन म्हणजे पालखी होय. ही सहा ते सात फूट लांब व तीन फूट रुंद असते. हिच्यावर एक लाकडाची कमान असून कमानीवरून झालर वगैरे सोडतात. पालखीच्या बाजूस एक गुलाम अब्दागीर बरोबर घेऊन चालतो व ऊन जसजसे फिरेल तसतसा उन्हाच्या तिरपीपासून मालकाचे रक्षण व्हावे म्हणून या किंवा त्या बाजूस मागे पुढे राहात असतो. पालखी वाहून नेण्यास मागे व पुढे तीन तीन माणसे असतात. या पालखीवाल्यास महिना ४।५ रु. दिले म्हणजे पुरे होते. तुम्ही गाडींतून प्रवास करा की पालखींतुन करा, तुम्ही बरोबर २० ते ३० सशस्त्र शिपाई घेतलेच पाहिजेत. कधी कधीं या प्रवासांत डौल दाखविण्यासाठी निशाणेहि घेतात. इंग्रज ब डच कंपनीचे अधिकारी अशा रीतीनें जातात. वर सांगितलेले सशस्त्र शिपाई नुसते डौलाकरितां नाहींत, रक्षणासाठी आहेत तुम्ही ज्या शहरांतून हे शिपाई घ्याल त्या शहरांतील त्यांचा मुख्य या शिपायांच्या विश्वासूपणाबद्दल ग्वाही देतो. परंतु या ग्वाहीबद्दल त्याला दर शिपायाबद्दल दोन रुपये द्यावे लागतात. | हिंदुस्थानांतील उन्हाळ्याची झळ ज्यांना सोसत नाहीं ते रात्रीचा प्रवास करतात व दिवसा विश्रांति घेतात. अस्तमानी ते एखाद्या तटबंदीच्या शहराजवळ आले तर त्यांनी त्या ठिकाणीं सूर्यास्तापूर्वीच शहरांत प्रवेश केला पाहिजे; कारण एकदां रात्र पडली कीं तटाचे दरवाजे बंद होतात. रात्री कांहीं चोरी मारी झाल्यास त्या शहरचा कोतवाल त्याला जबाबदार असतो. हा कोतवाल आपल्यावरील जबाबदारीमुळे रात्री कोणास हालचाल करू देत नाही व हा राजाचा हुकूम असे सांगून अत्यंत कडक रीतीने वागतो. अभ्यास :--सतराव्या शतकांतील प्रवासाची साधने व आजची प्रवासाची साधने यांची चित्रे काढून शेजारी मांडा. प्रत्येकाचा ताशी वेग लिहा व पूर्वीच्या व आजच्या प्रवासखर्चाची व सौकर्याची तुलना करा..।