पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२८८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ५। । । । सतराव्या शतकांतील प्रवास [ प्रस्तुत उतारा टेंव्हनियरच्या प्रवास-वृत्तांतुन घेतला आहे हा ग्रंथ इ. स. १६७६ सालीं तीन खंडांत प्रसिद्ध झाला. त्याचे जॉन फिलिप्सने इंग्रजीत भाषांतर केले आहे. टेंव्हनियर इ. स. १६०५ साली पॅरिस येथे जन्मला. तो रत्नांचा व्यापारी असून पूर्वेकडील तुर्कस्तान, इराण, हिंदुस्थान वगैरे देशांत त्याने अनेक वेळा प्रवास केला होता. तो इ. स. १६८९ साली मॉस्को येथे प्रवासांत असतांनाच मरण पावला. -किणो पृ. १० ] आतां मी हिंदुस्थानांतील प्रवास करण्याच्या पद्धतीकडे वळतो. यथ घोड्याऐवजी बैलांचा प्रवासांत उपयोग करतात. बैलावरून प्रवास करणे सुखाच आहे परंतु प्रवासासाठी बैल निवडतांना बैलांचीं शिगें एक फुटांहून अधिक लांब नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे, नाहींतर बैल अंगावरच्या माशा वारतांना जोराने मान हलवीत असतां त्याची शिंगें स्वाराच्या पोटात खुपसण्याची भीति आहे. वैलाच्या नाकांत वेसण घालून त्या दोरीचा लगामा प्रमाणे उपयोग करतात. साधारण जागेवर प्रवास करावयाचा असल्यास ते बैलाला नाल ठोकीत नाहींत. युरोपांत बैलांना शिगांना दोरी बांधण्याचे चाल आहे. पण हिंदुस्थानांत, गळ्याभोंवतीं एक जाड चार बोट दा कातडी पट्टा अडकविला म्हणजे काम भागते. | कधी कधी ते प्रवासासाठी छोट्या गाडीचाहि उपयोग करतात. त्या दोन माणसे वसतात. परंतु प्रवास सुखाचा व्हावा म्हणून बहुधा एकच माणू त्यांत बसतो. बरोबर एक सामानाची कातडी पिशवी, एक दारूचे छ भांडे वगैरें सामान गाडीच्या सांठ्याच्या खाली अडकविलेले असते. या गाडाला पडदे अडकविलेले असतात. मी आपल्या गाडीसाठी जे बैल घेतले त्या ६०० रु. पडले. हे वैल एकसारखे ६० दिवस रोजी १२ ते १५ लीग (३६ ते ४५ मैलांचा ? ) प्रवास करू शकतात. गाडीचे भाडे रोजी रुपया पडते. सुरत ते आग्याचा प्रवास किंवा सुरत ते गोवळकोंड्याचा प्रवा दोन्ही सारख्याच अंतराचे आहेत. त्यांना प्रत्येकी ४० दिवस लागतात ४०-४५ रु. पडतात. दोवा के टोट