पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२८५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यापार करा, भलत्या भानगडीत पडू नका २५७ "कॅपनीनें पूर्वेकडील देशांशीं व्यापार करतांना आमच्याशी मित्रत्वाने राहणा-या ख्रिश्चन राष्ट्रांनी आधीच पूर्वेकडे जेथे वसाहती केल्या आहेत तेथे त्यांच्या परवानगीवांचून वसाहती करू नयेत

  • कंपनीला तुर्त दिलेली पंधरा वर्षांची मुदत एकंदर व्यवहार आमच्या राज्यास फायदेशीर दिसल्यास पुढेहि वाढवण्यात येईल.
  • ही सनद वेस्टमिन्स्टर येथे ३१ डिसेंबर इ. स. १६०० रोजी आमच्या कारकीर्दीच्या ४३ व्या वर्षी दिली असे.

अभ्यास :--पूर्वेकडील देशाशीं व्यापाराचा परवाना देतांना त्या देशांच्या सरकारची परवानगी घेतली पाहिजे असा निबंध या सनदेत नाहीं. इंग्लंडच्या एलिझाबेथने अकबराच्या ताब्यांतील हिंदुस्थानांत आपल्या व्यापायांना कांहीं अधिकार द्यावेत असा हा प्रकार आहे, ही गोष्ट ध्यानात घ्यावी २ । व्यापार करा, भलत्या भानगडीत पडू नका (सर टॉमस रोचे इंग्लंडच्या राजास पत्र इ. स. १६१४) ।

  • व्यापारासंबंधाने आपल्या इच्छा सफल होण्यास अडचण नाहीं. बादशाहाशी बरोबरीच्या नात्याने कायमचा तह होणे मात्र शक्य नाहीं मोगलांस मदत करणे किंवा तटवंदी करून किना-याचे रक्षण करणे असले वेत निरुपयोगी आहेत. व्यापार व युद्ध या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध होत. समुद्रावर शांतपणे व्यापार करून मिळेल तोच नफा मिळविण्याचा आपण आपल्या मनांत हेतु ठेवला पाहिजे."

--मराठे व इंग्रज, पृ. १६.