पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२८३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ था ब्रिटिश अम्मल ईस्ट इंडिया कंपनीची पहिली सनद ३१ डिसेंबर १६०० [ ज्या ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानांत ब्रिटिश राज्याचा पाया घातला तिची सुरुवात कशी झाली ते पाहणे मनोरंजक आहे. पोप ६ वा अलेक्झांडर याने काढलेल्या फतव्यान्वये पोर्तगालला पूर्वेकडील व्यापाराचा मक्ता मिळालेला होता (इ. स. १४९३). कालांतराने पोर्तुगाल रुपेनच्या ताब्यांत गेले. स्पेन व इंग्लंड यांचे १६व्या शतकांत वांकडे होते. पूर्वेकडील व्यापारांत आपल्याला वांटा मिळाला पाहिजे असे इंग्रज व्यापा-यांना वाटून त्यांनी २४ सप्टेंबर १५९९ रोजी लंडनमध्ये फाऊंडर्स हॉलमध्ये लॉर्ड मेयरचे अध्यक्षतेखाली सुभा बोलाविली व थेट हिंदुस्थानशीं व्यापार करण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा ठराव पास केला. या संस्थेला पुर्वेकडील व्यापाराची मक्तेदारी मिळावी म्हणून त्यांनी राणी एलिझाबेथकडे अर्ज केला. त्या अजन्वये राणीने सदरहू व्यापा-यांस सनद दिली. त्यांतील प्रमुख कलमांचे सारांशवजी भाषांतर पृढे दिले आहे. मुकर्जी पृ. १-२०] परमेश्वर कृपेने इंग्लंड, फ्रान्स व आयलंड या देशांची राणी, धर्म-संरक्षक इत्यादि पदव्यांनी युक्त अशी ही एलिझाबेथ जाहीर करते की, ज्या अर्थी आमचे प्रिय आप्त जॉर्ज अर्ल ऑफ कंबर्लंड व त्यांचे बरोबरच आमच्या प्रजाजनांपैकी २१४ जण यांनी आम्हांकडे असा अर्ज केला आहे कीं ईस्ट इंडीज आणि आशिया व आफ्रिकेकडील प्रदेश या भागांशी व्यापार व दळणवळण करण्यासाठी स्वखर्चाने व स्वत:च्या हिंमतीवर जहाजे पाठविण्याचा आम्हांस एकमेव मक्ता असावा व ज्या अर्थी या उद्योगाने इंग्लंडच्या आरमारी बळांत व वैभवांत भर पडेल त्या अर्थी सर्वांनी जाणावें कीं आमच्या देशाच्या सन्मानार्थ व प्रिय प्रजेच्या संपत्तीच्या अभिवृद्धयर्थ आरमाराच्या बळकटीसाठीं व व्यापार वाढण्यासाठी आम्ही सदरहू मंडळींना ‘गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चट्स ट्रेडिंग इन् दी ईस्ट इंडीज' या नांवाने त्याप्रमाणे संपूर्ण व्यापाराची सनद देत आहोत.