पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतापसहार्थे बाणदार उत्तर २४९ ९ ४९

: प्रतापसेिहाचं बाणदार उत्तर

शास्त्री दप्तरांतील वेचे नंबर १०८ पृ. २०७ } श्र १ सुमारें इ० स० १८३९ [ शास्त्रो दप्तरांतील वेंचे, हें पुस्तक बडोद्याच्या राजदप्तरखात्याने १-२-४८ ला प्रकाशित केले. गंगाधरशास्त्री हे बडोद्याच्या इंग्रज रेसिडेंटाकडे मदतनीस म्हणून काम करीत. पुढे इंग्रजांनी त्यास फत्तेसिंग गायकवाडाकडे कंपनीतर्फ मतालिक नेमले. प्रस्तुत संग्रहांतील पुष्कळ पत्रे इ. स. १८०३ ते १८१५ या कालांतील या शास्त्र्यांनी लिहिलेल किंवा त्यांना आलेली आहेत. गायकवाडांचा व पेशव्यांचा देणेघेण्याच्या व्यवहाराचा बाद होता. पेशव्यांना भेटून या वादाची सोडवणूक कर- ण्यासाठी इंग्रजांनी शस्त्र्यांना पुण्यास पाठविले. तेथून ते पंढरपुरास गेले असतां २० जुलै १८१५ ला त्यांचा खून झाला. या शास्त्र्यांच्या पदरीं यशवंतराव मराठे नांवाचे कारकून होते, त्यांच्या नातवाने प्रस्तुत दप्तर बडोदा सरकारकडे दिले. इ. स. १८०३-१८१७ पर्यंत बडोद्यास “ राजकारण चाले त्याची माहिती या संग्रहांत आहेयाखेरीज दोन कागद सुटेच दप्तरांत सांप- डले तेहि यांत समाविष्ट आहेत. त्यांतील एक सातारच्या प्रताप सिहाच्या वृत्तांताचा आहे. त्यांत वणलेला प्रसंग ऑगस्ट १८३९ मधील आहे. उतारा अपुराच सांपडलेला आहे खालील पत्रांतील मराठी भाषा पूर्वीच्या पत्रांतील भाषेइतकी अपरि चित नाही. फारसी शब्द मागे पडले इंग्रजीची छाप अजून पडावयाची होती अशा काळांत निव्वळ मराठी वळणाचे शब्द या पत्रांतून अधिक आहेत. पत्रांत गव्हर्नर कारनॅक याच्याशी प्रतापसिंहाच्या भेटीचे पांच

  • प्रसंग वणिले आहेत. हातीं सत्ता आल्यावर इंग्रज की जबरदस्ती

करीत याचा हें पत्र उत्तम नमुना आहेमराठेशाहीच्या पडत्या काळांत प्रतापसिंहाने दिलेली बाणेदार व चोख उत्तरं वाचल म्हणजे मराठ्यांचे राज्य गेले पण स्वाभिमानाचा पीळ गेला नाही याची साक्ष पटते.] सातायास गवरनर गेल्यावर तेच दिवसी रीसीदटास माहाराजानी [९३