२४५
पुण्यांत प्रळय : पट्टोची वसुली
४६ ः ः ः, पुण्यांत प्रळय : पट्टीची वसुली
३ जानेवारी १८०२
ए० ले० स० भा. १४ बा,
न ० ६५४५
सेवेशीं धोंडो बापूजी जोशी. त्रिकाल चरणावर मस्तक ठेवून शिर
साष्टांग नमस्कार विज्ञापना....गांवांत पट्टीचा तगादा प्रळय जाहला आहे !
होळकर यांणीं नाकेबंदी केली आहेदुकानें हर' कोणाची व घरें बहुतेक
उघड नाहींत. जिवाजीपंत नेने व रामराव पुरंदरे यांजकडील कारकून व
दमल शिंपी तिघे जण तस्ती अनेक प्रकारची करून मृत्यु पावले. आज चार
रोज होळकर घसा पट्टीस्तव गांवास फडके याचे कारभार बाडघांत होतो तेथे
येत असतात. धबळ२ घरपटी व उदीमपट्टी ’ चालली आहेकालपासून
बुधवार शनवागंत मोठा दंगा आहे. कारभारी लपत फिरतातजो सांपडेल
तो नेतात, पठाणाचे हवाली करितात, हाल करितात ते पत्रीं काय लिहूँ ?
- * * ५ लोक हरतर्हेनें बातमो बंदी असतां सङ रात्र वीरात्र करून जीव
मात्र घेऊन जातात. याजप्रमाणे प्रकार आहे. वसईस श्रीमंतांनी इंग्रज याजला आठ आणे देऊ करून चाकरीस आणिलें. त्याजला मुलुख गुजराथ अठाविसी ' झाडून व श्रीकृष्णातीर दो प्रांत देण्याचा करार करून चार ( पलटण आणलीं. आणखी येणार हें वर्तमान बोलतात. . .मातुभयशवदाबाई ’ रायगडावर आहेत. तेथे कोणी वेळेस काय होईल न कळे. शहर मकं घातले आहे ! वाड्यावर आख' पडल्यास मग जीव बचावण्यास कठीण आहेत. वडिलांचे पुण्यैकरून पार पडेल त खरें. श्रीहरि पार करवीलबहुत काय लिहिणें. सेवेशी धृत होय हे विज्ञापना. १ दर प्रत्येक . २ श्रम हाल सोसून. ३ व्यापारावरील सरकारी कर. * जकात. ५ येथे पत्र फाटले आहे६ राज्याचा अर्धा भाग. ७ अठ्ठावीस महालाच सुरत. ८ सवाई मधबरावाची स्त्री. ९ आग. [८ १६ स. इ.