पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहिल्याबाईची सूक्ष्म राजकीय दृष्टि २३९ होते बोलणे कांही न होतां वीडे घेऊन गेले बोलण्याचा प्रसंग न घालतां परस्परे मेजवान्या होऊन लौकरच जामगांवास जाणार तेथून रााो आवा चिटणीस व रामजी पाटील यांचे हाते बोलावयाचे ते बोलावें या प्राो बेत आहे. बोलणे. मीनाने सुद्धा आपल्या कडील प्रसंग घालणार त्याची पुरवणीअलाहिदा लीहीली आहे श्रीमंतास नजर नजराणा फरमान बाडी* करून घ्यावा असे पाटील बावाचे मानस. पातशाही चाकर होऊन घेऊ नये असे श्रीमंताचे मानस. घडेल तसे मागहुन लीहुं म्हणोन लिी ते कळले. येसियांसी सीदे यानी पातशहाची वजारत संपादुन कारभार केला सीक्यात पातशहाचे वजीर श्रीमंत त्याचे मुतालीक आपण असा अन्वय आणून वहिवाट केली त्या पक्षी नजर नजराणा फरमान वाडी करून घ्यावा हे त्यांस उचीतच. परंतु पूर्वीपासोन कैलासवासी बाजीरावसाहेब यांचे कारकीर्दीपासोन आज पावेतो दीलीत पातशहा बलाय मजबुत फौज व बलाय खजाना मुलकांत आमल दखल करून होते. तेव्हां जोर पोहोंचाऊन पातशहा लुटून मारून नवे पातशहा स्थापीत केले ते समई पातशाहीच केली असती तरी योग्यता होती-परंतु राजे याचा वरदहस्त मस्तकी आहे तोच असून पृथ्वीत लौकीक असावा याजवर नजर देऊन पातशहा आपले हाते स्थापुन आटक पर्यंत राज्य केले. विचार पहातां फरमान बाडी करून वरून नजर नजराणा घेऊन पातशाही चाकर म्हणवावें यांत आधीक्य नाहीं. राजश्री बालाजीपंत नाना व राजश्री हरीपंत तात्या वीचारवंत आणि सर्व गोष्टी त्यांचे ध्यानात आहेत. तेही श्रीमंतास असी सला देतील असे नाहीं तत्रापी सींदे यांचे भिडेस पडल्यास न कलें" याज करीतां तुम्ही प्रसंगोचीत नाना व तात्या यांहि सुचवणे रााा छ १४ जल्किद सुाा सलास तीसैन मया व आलफ बहुत काय लिहिणे हे विनंती मोर्तब सुद. | अभ्यास :--फरमानबाड़ी करू नये असे अहिल्याबाईला कां वाटलें ? राजकीय दृष्ट्या पेशव्याने पातशाहीचे चाकर कां होऊ नये ? मराठी राज्यविस्तारांतील अभिमानाचा पराक्रम कोणता ? पेशव्यांनीं पातशाहीच कां मारून टाकली नाहीं ? हा फरमान बाडीचा समारंभ झाला कीं नाहीं ? । . १ (मौनाने ?) २ न बोलता सुद्धा आपलें साधणार. ३ निराळी. *फर्मान घेण्याचा दरबार. ४ बिला-बिना-बिना. ५. कळत नाहीं. [८३