पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ । हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास - एकूण कलमें तेरा लिहिली आहेत, तीं ध्यानी आणोन चालल्यास उपयोगी पडतील. बहुत काय लिहिणे हे आशीर्वाद.

  • अभ्यास :-१. पेशवाईतील राजपुत्रांचे शारीरिक शिक्षण व बौद्धिक शिक्षण कोणतें होते ? या शिक्षणांत आणखी कोणती भर सुचवाल ? त्यांच्या जीवास कोणत्या प्रकारे जपत ? २. क्रमांक ३६, ३८, ३९, ४० हे उतारे वाचून पेशवेकालीन चालीरीति' यावर एक छोटा निबंध लिहा.

४१ । । अहिल्याबाईची सूक्ष्म राजकीय दृष्टि [ चंद्रचूडांच्या दप्तरापैकीं 'निवडक उतारे' नांवाचे एक पुस्तक ग्वालेर दरबारने इ. स. १९३४ साली प्रकाशित केले आहे. गंगाधरपंत चंद्रचूड हे होळकरांचे दिवाण. त्यांच्या घराण्याच्या संग्रहांतील ही पत्र आहेत. होळकर आणि शिदे ही दोन्ही घराणीं उत्तरेत एकत्र काम करीत असल्याने या संग्रहांत महादजी शिदेकालीन राजकारणाची माहिती आली आहे, या दृष्टीने ग्वाल्हेर दरबारने में प्रकाशनकार्य केले. संग्रहाचे संपादक श्री. डोंगरे प्रस्तावनेत लिहितात " या तीस वर्षांत (१८व्या शतकांतील शेवटचीं३०वर्षे)शिंदे, होळकर यांचे संबंध कसकसे होते,नवीन मिळालेल्या मुलुखाच्या वाटण्या कशा होत असत, उभयतांनीं कामगिन्या कोणत्या केल्या, दिल्ली, सातारा व पुणे येथील दरबाराविषयी त्याचा मनःस्थिति वेळोवेळीं परस्पर विभिन्न कशी होती इ. मुद्यांची हकीकत या पत्रावरून चांगली उघडकीस येते. या पत्रसंग्रहांतील क्रमांक १०५च पत्र पुढे दिले आहे. अहिल्याबाई होळकर यांची सूक्ष्म राजकीय दृष्टि ध्यानांत येण्यास त्याचा उपयोग होईल. ] | ता. ५ जुलई इ. स. १७९२ | श्री राजश्री यशवंतराव गंगाधर | दंडवत वीनंती उपरी श्रीमंताच्या व राजश्री पाटील बावाच्या भद गोसावी यांसि. ज्येष्ठ वद्य ९ बुधवारी होऊन दुसरे दिवशीं सरकार वाड्यांत पाटील बावा आ ८२ ]