पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालपेशव्याचा दिनक्रम २३७ १. लिहिणे जाहलेनंतर कांहीं उपकार थोडासा मर्जी असल्यास मुलासमवेत घेऊन करावा. नंतर तांबूल घ्यावा. घटी एक. एकूण घटिका चोवीस. | कलम ९. १. घोडीं फेरावयास चार रोजांनीं जात जावे. ते समयीं बरोबर पटवर्धन मंडळी व अन्यत्र सरदार असावे. त्यांशीं भाषण करणे ते संतोषवृत्तीने करावे. परंतु अत्यंत लोभही नसावा वे विरुद्धही न दाखवावे. कांहीं अंतर' जाहल्यास क्षमा होणार नाहीं असें भय असावें. योग्यता बघून त्याशी भाषण संतोषेकरून करावे. दिवाण यांणीं राजकारणाचे वर्तमान व पुढील योजना करावयाचा विचार करून विनंती करीत असावी. त्या समयीं अन्यत्र कोणी असों नये. व त्यांतील अभिप्राय दुसयापाशीं निघों नये. म्हणजे मसलतीं असाध्य होत नाहीं. बातमी हरत-हेची राखावी म्हणजे मसलतीस बल बहुत आहे. पदरच्या मनुष्यांचे चालवावयाचे त्यास जिकीर करू नये. एकूण घटी चार. ए कूण घटिका अठ्ठावीस. | कलम १० १. तिरंदाजी करावयास जावे. तेथे बरोबर सरदार व पागे व मानकरी बरोबर असल्यास तीर कोण कसे मारताहेत ध्यानांत असावे. व हरएक खेळ पहावयाचे ते सर्वत्र समवेत पहावे. येणेप्रमाणे घटिका दोन. एकूण घटिका ३० कलम ११ १. दीपदर्शन जाहल्यानंतर संध्येस वस्त्रांतर करून बसावे. संध्या जाहले नंतर स्तोत्रपाठ म्हणावा. नंतर पुरुषसूक्त अथवा पवमानांतील अध्याय म्हणावे. ते समयीं अश्रितांनी जवळ असावे. नंतर भोजनास जावें. भोजन होऊन उठेपर्यंत घटी चार. | कलम १२ | १ भोजनोत्तर तांबूल खावयास दिवाणखान्यांत क्षणभर बसून तांबूल घ्यावे. नंतर कार्याकारण मंडळी जवळ असावी. ते समय बातमीदार यांणीं वर्तमान गुप्त सांगत असावे. व हरएक बातमीची पत्रे आलेलीं पहावयाजोगीं असतील ती पहावीं. बाकीची पत्रे विश्वासूक मनुष्य कोण असेल त्याजकडे काम योजावे, त्यांणीं सांगावे. व त्यावर ही बातमी प्रमाण अथवा अप्रमाण सांगतात याची चौकशी असावी. नंतर निद्रेस जावें. येणेप्रमाणे घटी तीन. एकूण घटिका सात. कलम १३ १ फरक, गैर गोष्ट. २ पुरुषसूक्तासारखा एक मंत्र.