पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळपेशव्याचा दिनक्रम २३५ ग्रहणार्थ तुम्ही या कुळांत जन्म घेऊन पुरंदर येथे उदयास आला; त्यापक्षीं इकडून लिहावयाचे कारण दिसत नाही. परंतु मानवी देह आणि तुम्ही लिहिले, त्यापेक्षां तूर्त चालावयाचे जे सुचले ते लिहिले आहे. तपसील कलम बंदी :-- १ प्रातःकालचे घटका रात्रौ उठोन दिशेस जाऊन पादप्रक्षालन मुखप्रक्षालन करून दिवाणखान्यांतील श्रीमृत्तिका गणपतीचे दर्शन घेऊन प्रातःस्मरणाचे श्लोक म्हणावे. नंतर सूर्योदयाबरोबर वैद्यांनीं येऊन हात पहावा. प्रकृतिअन्वयें औषध घ्यावे. नंतर लिहावयास बसावे. कित्यांत हात फिरवून मग ज्या कागदावर निशाणे व्हावयाची असतील ते लिखितान्वयेच वाचावे. ते समयीं जवळ गुरुजी व आणखी एक दोघे संभावित योग्य असतील ते असावे. जास्त असो नये. येणेप्रमाणे घटिका तीन. येकूण घटिका. कलम १ । १. तालिमखान्यांत जाऊन दंड' काढावे. दिवसेंदिवस शक्ति अन्वये चढते दंड असावे. बरोबर समवयी मुलें पांच चार संभावितांची असावीं. व जेठी एक दोघे व नेहमी विश्वासुख गृहस्थ बरोबर असावयाचे ते असावे खिसमतगार कार्याकारण असावे. जेठी यांनी कुस्तीचे डाव शिकवावे. नंतर समवयी मुलांसुद्धां प्रकृतीस जो खुराख मानेल तो नेमकरून घेत जावा. येणेप्रमाणे घटिका दीड. येकूण घटी साडेचार. कलम २ २. स्नान करावयाचे समय पंचांग जोशी वाचून संकल्प सांगावा. नंतर गंगाष्टक म्हणावें, संध्या थोडकी, परंतु न बोलतां करावी. कलम ३ १. कचेरीस यावे ते समयीं सर्वांस येऊन योग्यतेनुरूप नेत्रलाभ व भाषण होत असावे. कचेरीत लघु शब्द बोलू नये व गैर नि ही (?) बोलू नये. मनुष्यपरीक्षा असावी. गैरवाखा' एखाद्याने समजाविलेस पक्केपणीं विचार करून अपराध ठरल्यास दुस-याकडून त्यास निषिद्ध करवावे. आणि आपण नेत्रकटाक्ष करून पहावें. अपराधानुरूप पारपत्य करावे, परंतु संभावित गृहस्थ बहुत दिवस पदरींचा प्रामाणिक अशानें रदबदली केली असतां क्षमा करावी. १ नारायणरावाच्या वधावर सूर्यग्रहणाचे हे रूपक आहे. सवाई माधवराव हा अवतारी आहे असा तत्कालीन समज गोपिकाबाईच्या मनांतहि आहे. २ शेवटील अक्षरें “आज्ञा प्रमाण हीं अक्षरें सहीच्या ऐवनीं घालीत. ३ लिहिलेले समजून घेऊन वाचावे. ४ जोर. ५ वाढते. ६ मल्ल, कुस्तीगीर. ७ गैरवाजवी, बनावट. g९