पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२५४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| नारायणराव २२५ नारायणरावाचा खून • नारायणरावाचा खून ऐतिहासिक लेखसंग्रह। सप्टेंबर १७७३ भाग ४ था, नं० १२५७ / | [पत्र शिवाजी बाबाजीचे पुण्याहून वामनरावास मिरजेस. हे पेश-- व्यांचा खून झाला त्याच्या तिसरे दिवशीं लिहिलेले आहे. खून ता. ३०-८-१७७३ रोजी झाला.] ..त्या गडबडींत इच्छारामपंतास' तीन जखमा लागल्या. दुसरे दिवशीं मृत्यु पावला. नारायणजी नाईकास सदरेस बसल्यावर मारून टाकला. त्याप्रमाणेच फडके यांस करावे म्हणून बोलिले. आणखी ब्राह्मण चार पांच व चाफाजी खिजमतगार ठार झाला. त्या गडबडेत (धाकटे श्रीमंत) थोरल्यांजवळ जाऊन पोहचले होते. * दादासाहेब ! वांचवावे, किल्ल्यावर घालावे, नाचण्यांची भाकर द्यावी, असे म्हणून गळां मिठी घातली तेव्हां (त्यांणीं) लोटून दिला. तुळाजी पवार भेदला होता त्याणीं पायांस धरून ओढिला. सुमेरसिंगाने वार टाकिला. पांच सहा वारांनी पुरा झाला. तेथेच चाफाजी ठार झाला.' असे होतांच (दादासाहेब) सदरेस जाऊन बसले. तमाम चोपदारांस वगैरे यांस बोलवू पाठवून बंदोबस्त करू लागले. सुतक नाहीं. नित्य नमस्कार सूर्यास घालितात. * वैरियाचे सुतक कशास ? " म्हणतात ! गोवधदेखील वाड्यांत झाला. दोघी कुणबिणी मेल्या. बालहत्या, ब्राह्मणहत्या, गोहत्या, स्त्रीहत्या सारेच झाले ! ! ! गंगाबाई आनंदीबाईने कोंडोन खोलीत ठेविली, दहनास तिकडे गेल्यावर विधि उरकविला. रात्रीस करू नये पण ते समयींच गुंता उरकविला ! हे राजकारण फार दिवस घाटत होते त्यांत मोठे मोठे होते असे आतां उद्गार निघतात. ज्यांनी राजकारणे केली होती त्यांचे मानस (पेशव्यांस) कैद करावे असे होते. परंतु करावयास गेले एक आणि झालें एक ! ईश्वराच्या चित्तास आले तसे झाले ! आतां त्राता कोणी नाहीसा झाला. गाडद्यांचे प्राबल्य बहुतच होते की, (आम्हीं) “ राज्याचा खावंद मारिला. होता तो मारिला. आतां निम्मे राज्य वांटून देणे" असे बहतच १ढेरे. २ मुख्य कचेरी. ३ वपन विधि. पण ही बातमी पुढे खोटी ठरली.