पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० हिंदुस्थानच साधनरूप इतिहास २७. : : : निजाम उल्मुल्क यानं मृत्युसमय पुत्रास केलेला उपदंश । इतिहास संग्रह, वर्ष ७ इ. स. १७४८ अंक ४५६ पृ. ३१ / [ पुढील उतान्यावरून निजामाची मराठे लोकांबद्दलची कल्पना, तसेच आपण स्वतंत्र आहो क बादशाहाने नोकर आहों याबद्दलची जाणीव ही दोन्ही कळून येतील. या उपदेशाचीं एकंदर १७ कलमें आहेत. निजामाने आपला पुत्र नासिरजंग यास मृत्युसमयीं उपदेश केला त्या वेळेस तेथे राज्याचे सदरुस सुदुर (मुख्य न्यायाधीश) बिछान्याशीं बसले होते. त्यांनी त्या उपदेशाचे पेन्सिलीनें कागदावर टिपण करून ठेवले. या १७ कलमांपैकी निवडक पुर्जे दिली आहेत. प्रा. जदुनाथ सरकार यांनीं मॉडर्न रिव्ह्यूच्या ऑगस्ट १९४८ च्या अंकांत यास 'निजामधे मृत्युपत्र' म्हटले आहे तें मात्र बरोबर दिसत नाही. ] १ दक्षणचे राज्य करणारास योग्य आहे की मराठे लोक या देशचे जमदार आहेत त्याशी सल्लेने वागावें. ३. आपले बय मुशाफीत घालून नवी जागा नवे पाणी व छाया तांबूची येणेप्रमाणं हरएक उपभोग घ्यावे. कारण ईश्वरी आज्ञा नित्य मुशाफिरी करण्याविषयी कुराणांत आहे. आणि मुलखाचा बंदोबस्त होतो. परतु बरसात व जरूरी पुरती छावणीहि करावी. कारण.अशा समयांत सर्व जीवास श्रम होतात. आणि शिपाई यांची तैनात जवळ पास करीत जावी. कचाकरितां कीं त्यांचा वंशखंड होऊं नये. ७. दक्षण देश सहा सुभे. त्यांत हरएक सुभ्यास एक एक बादशाह होते आणि लाखो शिपाई पाळले जात असत. सांप्रत ही पृथ्वो कैलास (पैगंबर? ) वासीयांचे वेळेपासून एकाकडेच जालीत्याक्षीं योग्य हे आहे की हरएक खानदानी लोकांची खबर घेऊन, त्यास आपले सरकारले कामावर ठेवून; वारंवार त्यांची बदली एक दो सालांत करणे व वाढविणें हें मुख्य मानून हाच शिरस्ता आपण व आपले वंशजांकडून जारी ठेवावा. १ औरंगजेबापासून ५४]