पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तयार केलेली चिकणमातीची भांडी अगदी पातळ, सफाईदार व सुंदर अशी आहेत. भांड्यांना देण्यासाठी एक प्रकारचा चकाकणारा काळा रंग तयार केलेला असे. अशा रंगांनी रंगविलेली भांडी लगश, एरिड व ऊर या गांवीं सांपडली आहेत. जनावरांची चिनहि त्यांवर काढलेली आहेत, परंतु ती ठराविक, आंखांव पद्धतीची काळ्या रूपरेखेनें काढलेली आहेत. माणसांची चित्रे मात्र अशा आंखांव नमुन्याची नसून वास्तव स्वरूपाची आहेत. त्यांचा काल ख्रिस्तपूर्व ४५०० ते ४००० पूर्व इतका तरी प्राचीन आहेच आहे. आमच्या मते रिनस्तपूर्व ५००० च्या पूर्वी मध्य आशियापासून इरा- णच्या मैदानापर्यंत व दुसरीकडे मिसर ( इजिप्त ) व सीरिआपर्यंत एक मोठी संस्कृति पसरली होती, व तिचीच एक शाखा सुमेरियांत असून, त्या शाखेत खिस्तपूर्व ४००० च्या पूर्वी कलाज्ञानांत पुष्कळ प्रगति झाली होती. त्या काळी भांडी, पुतळे व इतर वस्तू तयार करण्यासाठी तेथील लोक साधा दगड व संगमरवर यांचा उपयोग करूं लागले होते. त्याचप्रमाणे asphalt या मातीच्या विशिष्ट मिश्रणाचे केलेले वरील पदार्थहि सापडले आहेत. सुसा येथे माणसांच्या डोक्यांचे पुतळे सांपडले आहेत, व त्याचप्रमाणे ' लगश' या गांवीं पण असे अनेक पुतळे सांपडले आहेत. ते हल्ली परिस जवळील 'लुब्ह' च्या अजबखान्यांत ठेवलेले आहेत. या संबंधींची विशेष माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या Cambridge ancient History, First volume of Plates by C. T. Seltman या ग्रंथांत दिलेली आहे. तविरून पहाता लगश, येथे सांपडलेल्या पदार्थात एक वाटोळा चबुतरा सांपडला आहे. त्यावर उठावदार ठशांनी ( bas-relief ) एक लढाऊ लोकांची पलटण दाखविली आहे. तीतील माण- सांची चित्रे चांगली स्पष्ट दिसण्यासारखी आहेत. यानंतर तत्कालीन मनुष्यांचें रूपवर्णन असलेल्या तक्षकलेच्या ( Seulpture) च्या नमुन्यांत 'गृध्रतक्षफलक' ( Stele of the vultures ) म्हणून एक सपाट पृष्ठाचा दगड असून त्यावर चित्रे कोरलेली आहेत. या फलकांत सुमेरिअन लोकांचे शहर ' लगश' यावर शत्रूनी हल्ला केला असता, सुमेरिअनांनी त्यांचा पराभव करून त्यांना ठार मारले व त्यांची प्रेते गिधाडांकडून खावयासाठी फेकून दिली, ती गिधाडें खात आहेत, असा देखावा दाखविलेला आहे. 'लगश ' चा मुख्याधिकारी- ज्याला 'पटेसी' ( patesi ) असे म्हणत त्याने लगशवर स्वारी करणारा शेजा- रचा राजा ' उम्मा ' याच्या सैन्यावर एक प्रकारचे जाळे टाकले व त्याना ठार मारून टाकलें, अशा अर्थाचा लेख त्या शिलेवर कोरलेला आहे. त्याप्रमाणे त्या चित्रांत 'इआ-नाटम् । पटेशी याने 'उम्मा ' च्या सैन्यावर जाळे टाकले आहे, व त्या जाळ्यावर सुमेरच्या ध्वजावरील 'सिंहमुखी गरुडा' चे चित्र काढलेले आहे. त्याच फलकांत यापुढे एक चारचाकी गाडीचा पुढचा भाग दाखविला आहे. गाडीच्या डाव्या बाजूस चाकावर एक फळी लावलेली असून तिच्यावर एक आंतील योद्धयाचा शरीररक्षक हातांत परशु व भाला घेऊन उभा असलेला दाखविला आहे. खालच्या