पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी व सुमेरी चित्रकला आणि वंशविचार. AR द व सुमेर या दोनहि देशांतील अनेकविध सांस्कृतिक साम्यांचें विवेचन बेल्या चार लेखांकांत केले आहे, व त्या साम्यावरून मानव-वंश-शास्त्रदृष्टया या उभय देशांतील लोकांच्या संबं- वाने काय निष्कर्ष निघतो, हे या अंकांत परीक्षिण्याचे आम्ही ठरविले आहे. तसे करण्यास वास्तविक त्या दोनहि कालांतील माणसें उपलब्ध व्हावयास हवीत. परंतु आज मितीस सुमेरिआ तर नामशेष होऊन हजारों वर्षे होऊन गेली आहेत व वेदकालीन भारतीय आयर्यांच्या वंशजांपैकी पंजाबांत जरी आर्य चेहरेपट्टीचा नमुना बराचसा मूळ समाजाशी समान अशा स्वरूपात सांपडत असला, तरी एकंदर आर्यसमाज हजारों वर्षेपर्यंत इतरवर्णीय लोकांशी मिश्रित झालेला असल्याने, तत्कालीन शुद्धस्वरूपांत सांपडणें दुष्कर आहे. तथापि सुदैवाने कलारूपाने सुमेरिआंत त्या लोकांच्या स्वरूपाचे नमुने अवशिष्ट राहिले आहेत, व सिंध व पंजाब येथील सशोधनांत जरी अद्यापपर्यंत त्या प्रकारचे अवशेष थोडे सांपडले आहेत, तथापि जसजसे हे संशोधन अधिकाधिक होत जाईल, तसतसें तत्कालीन लोकांच्या स्वरूपाचे ज्ञान पुतळ्यांच्या वगैरे रूपाने जास्त जास्त होईल, अशी आशा आहे. याशिवाय वैदिक वाडायांत आर्यलोकांच्या व त्यांच्या देवतांच्या स्वरूपाचे वर्णनदर्शक उल्लेख आहेत, त्यांवरूनहि तत्संबंधीची कल्पना येण्यासारखी आहे. तेव्हां यासाठी हिंद व सुमेर या दोनहि देशांत चित्रकलेची प्रगति आद्यकाली कितपत झाली होती, हे प्रथम आपल्याला पाहिले पाहिजे. प्रथमतः आपण सुमेरमध्ये हे कलाज्ञान कितपत होते ते पाहूं. यासंबंधी Cambridge Ancient History, Vol 1. या पुस्तकांत विवेचन केलेले आहे, तें सारांशरूपाने येणेप्रमाणे आहे:- ____“सुमेरी संस्कृतीतील प्राचीन कलेच्या नमुन्यांचे अवशेष 'सुसा' नावाच्या शहरी भूपृष्ठाखाली ६० मीटरच्या खोलीवर सांपडले आहेत. त्यांतील मातीच्या भांड्यांना उत्तम झिलई दिलेली असून, त्यांच्यावर उत्तम चित्रे काढलेली आहेत, कुंभाराच्या चाकाचा उपयोग त्या लोकांना चांगला माहीत होता, व त्यावर फिरवून